Friday, July 12, 2024

सलमानचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल; सोबत दिसली टायगर श्रॉफची आई, तुम्ही पाहिला का?

सिनेमीसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या बालपणीला उजाळा देताना दिसतात. अशातच प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीने म्हणजेच आयेशा श्रॉफ यांनी चाहत्यांसोबत व्हिडिओद्वारे जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे, जी कॅम्पा कोल्ड ड्रिंकची जाहिरात आहे.

आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) एक अभिनेत्री आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत सलमान खान (Salman khan) हादेखील दिसत आहे. हा व्हिडिओ 1983 सालचा आहे, जेव्हा सलमान तरुण होता आणि त्याने प्रथमच जाहिरात शूट केली होती. व्हिडिओतील मॉडेल्स सिराज मर्चंट, सुनील निश्चल, वेनेसा वाझ आणि आरती गुप्ता आहेत. सर्वजण कोला कोल्ड्रिंक पीत आहेत. यादरम्यान ते नावेतून एकेक करून समुद्रात उडी मारतात आणि पोहतात. जाहिरातीतील काही शॉट्स अंदमानमध्ये शूट करण्यात आले होते.

हा व्हिडिओ शेअर करत आयेशाने लिहिले की, “जेव्हा आयुष्य खूपच सोपे आणि मजेशीर होते. ऐकून आनंद झाला की, हे परत येत आहे. अंदाज लावा कोण आहे ते?” दिशा पटानीने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “तू खूप क्यूट दिसत आहेस.” पोस्टवर तिच्याव्यतिरिक्त सुनीता कपूर, संदीप खोसला यांच्यासोबतच इतर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Shroff (@ayeshashroff)

या जाहिरातीमध्ये सलमानने प्रथमच कॅमेराचा सामना केला होता. 1998 मध्ये ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म
स्ट्रगलच्या दिवसात नोरा फतेहीने श्रद्धा कपूरला शिकवला आहे डान्स, वाचा त्यांचा किस्सा
ऋषी कपूर यांच्या हट्टामुळे ‘या’ सुपरहिट चित्रपटाला दिला होता नकार, नीतू कपूर यांनी केला खुलासा

हे देखील वाचा