Tuesday, July 9, 2024

कोरोना वगैरे काही नसतं रे! चित्रपटाच्या तिकिटासाठीची गर्दी पाहून तुम्हीही हेच म्हणाल

कोरोनामुळे २०२० हे वर्ष चित्रपटांसाठी खूप वाईट ठरले. दहा महिने चित्रपटगृह बंद असल्याने भारतातील हिंदी सोबतच अनेक प्रादेशिक भाषांमधील मोठे चित्रपट प्रदर्शनाअभावी रखडले आहे. २०२१ सुरु झाले तरी या नवीन वर्षावरही कोरोनाचे सावट आहेच. मात्र अनलॉक सुरु झाल्यामुळे हळू हळू काही सिनेमे प्रदर्शित होत आहे. अलिकडेच ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन १९८४’ या हॉलिवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे टेन्शन बाजूला ठेवत साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये तर सिनेमागृहात चित्रपट बघण्यासाठी झुंबड उडाली आहे.

१४ जानेवारीला दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा ‘मास्टर’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगसाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली आहे. विजय सेतुपती आणि विजय थलपती हे दोन सुपरस्टार असलेला ‘विजय द मास्टर’ हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत असल्यामुळे या सिनेमाच्या तिकिटांसाठी लोकांनी तोबा गर्दी केली. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत लोकं चित्रपट बघण्यासाठी गर्दी करत आहे. कोरोनासारख्या महामारीतही लोकांची या सिनेमाबद्दल आणि या दोन कलाकारांबद्दल असलेली क्रेझ या गर्दीतून दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच भारतात या सिनेमाचे शो हाऊसफुल झाले आहेत. यापूर्वी अशी क्रेझ, गर्दी फक्त रजनीकांत यांच्यासाठीच लोकांनी पहिली होती. ह्या चित्रपटाचे यश आणि कमाई किती होईल याचा अंदाज आपण या गर्दी वरून लावू शकतो.

https://twitter.com/Thalapathy_Ntr/status/1349211562859323392

‘विजय द मास्टर’ हा सिनेमा देशभरातील ३८०० स्क्रीन्सवर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी चित्रपटगृहांमधील ५० टक्केच क्षमतेचाच वापर केला जाणार आहे. या नियमानंतरही या सिनेमाची सर्व तिकीटे विकली गेली आहे. यावरुनच आपण या सिनेमाच्या कमाईचा अंदाज लावू शकतो.
मुंबईतही या सिनेमाची मोठी उत्सुकता आहे. वडाळाच्या कार्निव्हल चित्रपटगृहाबाहेर बाहेर लोकांनी खूप गर्दी केली होती. त्यांनी यावेळी या सिनेमाचं पोस्टर लावलेले सॅनिटायझर आणि रोपट्यांचे वाटप देखील केले गेले.

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातील काही दृश्ये इंटरनेटवर लीक झाली होती. त्यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश कानगराज यांनी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कृपया दृशे व्हायरल करू नका अशी विनंती करत एक ट्विट केले. या सिनेमात विजय सेतुपती आणि विजय थलपती यांच्यासह मालविका मोहन्न हिची प्रमुख भूमिका आहे.

हे देखील वाचा