Sunday, June 8, 2025
Home अन्य शानदार शुक्रवारमध्ये मनोरंजनाचा होणार डबल धमाका, जेव्हा केबीसीच्या मंचावर येणार तारक मेहताची संपूर्ण टीम

शानदार शुक्रवारमध्ये मनोरंजनाचा होणार डबल धमाका, जेव्हा केबीसीच्या मंचावर येणार तारक मेहताची संपूर्ण टीम

‘कौन बनेगा करोडपती’ शो प्रेक्षकांचा खूप आवडीचा शो आहे. या शोमध्ये मनोरंजनासोबतच ज्ञान आणि भरपूर पैसा मिळवून देणारा हा शो मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. याच प्रमाणे अजून एक शो आहे जो आयुष्यात उपयुक्त असणाऱ्या उत्तम शिकवण देत प्रेक्षकांना खळखळून हसवतो आणि त्यांचे मनोरंजन करतो. त्या शोचे नाव आहे, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. हे दोन्ही शो खूप जुने आणि प्रेक्षकांच्या हृदयात मोठी जागा निर्माण केलेले आहेत. आता विचार करा या दोन शोची मजा तुम्हाला एकत्र पाहायला मिळाली तर? नक्कीच तुमच्या मनोरंजनात दुपट्टीची भर पडेल यात अजिबात शंका नाही. मात्र हे असे घडणार कसे? लवकरच केबीसीमध्ये तारक मेहतांची टीम हजेरी लावणार आहे. या भागाचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला असून, या प्रोमोमध्ये तारक मेहताची पूर्ण टीम दिसत आहे.

केबीसी मध्ये दिसणार तारक मेहताचे कलाकार
बिग बीचा प्रसिद्ध शो केबीसी १३ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता या शोमध्ये तारक मेहता ची पूर्ण टीम सहभागी होणार असून, सोनी टीव्हीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या भागाचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यात अभिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर जेठालाल आणि बापूजी बसलेले दिसत असून, ह्याच दरम्यान जेठालाल (दिलीप जोशी) बिग बी यांना विचारतात की, तुम्ही अभिषेक ओरडतात का? या प्रश्नावर उत्तर देत अभिताभ म्हणतात, जेव्हा तो लहान होता तेव्हा ओरडायचो आणि मारही द्यायचो पण आता तो मोठा झाला असून, आता माल त्याची आता गरज पडत नाही. यानंतर अभिताभ बच्चन जेठालालला विचारतात की, तुम्हाला ओरडा बसतो का? यावर जेठालाल बोलतो की मुळीच नाही. पण त्याच वेळी बाबूजी जेठालालवर ओरडतात आणि या शोमध्ये सहभागी असलेले प्रेक्षक हसायला लागतात. सोनी टीव्हीने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम वर शेअर करताना त्याच्या कॅप्शन मध्ये असे लिहिले की, “प्रश्न आणि उत्तरानं सोबत असणार खूप सारी मज्जा मस्ती आणि मजेदार किस्से.” केबीसीच्या मंचावर येणार तारक मेहताची टीम येणार म्हटल्यावर शानदार शुक्रवार आधीच शानदार होईल यात शंका नाही. येत्या १० डिसेंबरला रात्री ९ वाजता हा भाग प्रसारित केला जाणार आहे.

शोचे हजार एपिसोड झाले पूर्ण
कौन बनेगा करोडपती या शोचे हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. यादरम्यान अभिताभ बच्चन यांची मुलगी आणि नात यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. जया बच्चन या व्हिडिओ द्वारे शोचा हिस्सा झाल्या होत्या. यादरम्यान अभिताभ बच्चन भावनिक होताना दिसले. त्याचबरोबर जया बच्चन यांच्यासोबत क्युट बॉन्डिंग पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा