×

शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉन अब्राहमने वाजवली होती चाहत्याच्या कानाखाली; पण काय होतं कारण?

रुपेरी पडद्यावर डॅशिंग भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम खऱ्या आयुष्यात शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो आपल्या चाहत्यांना कधीही नाराज करत नाही. वेळात वेळ काढून जेव्हा तो आपल्या चाहत्यांना भेटतो, तेव्हा तो चाहत्यांसोबत फोटो काढतो. तसेच त्यांना ऑटोग्राफही देतो. मात्र, नेहमीच अशी परिस्थिती नसते. शेवटी तोही माणूसच. अनेकदा चाहत्यांच्या गैरवर्तणुकीमुळे कलाकारांना राग अनावर झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. असेच काहीसे जॉन अब्राहमसोबतही घडले होते. नेहमीच शांत असणारा जॉन तेव्हा चांगलाच चिडला होता.

ही घटना ‘फोर्स २’ (Force 2) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची आहे. ‘फोर्स २’ या सिनेमाचे प्रमोशन करत असताना एका चाहत्याने जॉन अब्राहमबरोबर (John Abraham) सेल्फी काढण्यासाठी त्याचा टी-शर्ट पडून त्याच्याकडे खेचले होते. या गोष्टीवरून जॉनला राग आला आणि त्याने रागात त्याला थेट कानाखाली मारली.

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

ही बातमी जेव्हा पसरली, तेव्हा या बातमीला वेगळ्या पद्धतीने पसरविण्यात आले. जॉनच्या जवळचे काही लोक सांगतात की, या घटनेला लोकांसमोर आणताना फार वेगळ्या पद्धतीने आणले गेले. जॉन अब्राहम फारच साधा आहे. तो आपल्या चाहत्यांबरोबर असे वर्तन कधीच करत नाही. परंतु अचानक घडलेली घटना त्याला सहन झाला नाही आणि त्याने हे कृत्य केले. या घटनेनंतर जॉन अब्राहम स्वतः चाहत्याच्या घरी गेला आणि त्याने आपल्या या वर्तनासाठी त्याची माफी मागितली.

हेही पाहा- कोणी पैश्यांसाठी तर कोणी प्रेमासाठी घेतला प्रसिद्ध अभिनेत्रींचा जीव

जॉनने २००३ साली आलेल्या ‘जिस्म’ या हिंदी सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्याचा हा पहिलाच सिनेमा चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर त्याने अनेक हिट सिनेमे दिले. त्यात ‘धूम’, ‘सत्यमेव जयते’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा ‘सत्यमेव जयते २’ या सिनेमात झळकला होता. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर ‘पठाण’ या सिनेमा तो काम करणार आहे. तसेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘अटॅक’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे.

हेही वाचा-

Latest Post