Wednesday, July 3, 2024

बोल्ड अभिनेत्री असलेल्या ईशा गुप्ताने अतिशय खास व्यक्तीची घेतली गुप्त भेट, फोटोने उघड केले गुपित

बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि मादक अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ता (Esha Gupta) ओळखली जाते. ती तिच्या कामापेक्षा अधिक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. देशाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अतिबोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतील. मात्र नुकताच ईशाने एक खुलासा केला आहे. तिने तिच्या अतिजवळच्या व्यक्तीसोबत गुप्त भेट घेतली असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.

ईशाने तिच्या या गुप्त मुलाखतीचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये ईशाने मास्क लावलेला असून तिने व्हिडिओ कॉल केल्याचे दिसत आहे. एका बाजूला ती आणि दुसऱ्या बाजूला तिच्या अतिशय जवळ असलेली व्यक्ती बसली आहे. आता तुम्ही म्हणाल ईशाचा प्रियकर असेल? नाही तिच्या अतिशय जवळची दिसणारा व्यक्ती आहे तिचा डॉग. त्याला पाहून ईशा अतिशय खुश आणि उत्साहित दिसत आहे.

Photo Courtesy: Instagram/egupta

ईशा गुप्ता देखील कोरोनाने संक्रमित होती. ही माहिती देखील तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते की, “सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करूनही मी कोरोनाग्रस्त झाली आहे. मी सर्व नियमांचे पालन करत घरीच स्वतःला आयसोलेट केले आहे. मला विश्वास आहे की, मी लवकरच यातून बारी होऊन पुन्हा तुमच्या समोर येईल. तुम्ही सर्व काळजी घ्या आणि मास्क नक्कीच घाला.”

ईशा नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बोल्ड, अतिबोल्ड फोटो शेअर करत असते. तिला तिच्या या फोटोंमुळे कधी कधी ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो, मात्र ईशा त्याकडे दुर्लक्ष करत तिचे काम करत असते. ईशाने महेश भट्ट यांच्या ‘जन्नत २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिला या क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झाली. ईशा अतिशय फिटनेस फिक्र अभिनेत्री असून, ती सतत तिच्या फिटनेस व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

हेही वाचा :

हे देखील वाचा