साल २०२० हे वर्ष एकदाचं सरलं आहे. या वर्षात ज्या ज्या काही विचित्र घटना आपण अनुभवल्या, त्यामुळे ज्या कटू आठवणी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झाल्या आहेत त्या सहजासहजी पुसणं कठीण आहे. पण २०२० ला टाटा म्हणताना ही सुवर्णसंधी आपल्याकडे चालून आली आहे. या निमित्ताने संपूर्ण जगात जणू उत्सवाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत बी टाऊन सेलेब्जही त्यांच्याच स्टाईलमध्ये साल २०२० ला बाय बाय म्हणत आहेत. आता अभिनेत्री इशा गुप्तानेही आपल्या खास स्टाईलमध्ये २०२०ला बाय म्हणून सर्वांना चकित केलं आहे.
२०२० ला निरोप देण्यासाठी अभिनेत्री इशा गुप्ताने सोशल मीडियावर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवरील स्टॉक फोटोमध्ये इशा पलंगावर तिची अप्पर बॉडी स्ट्रेचिंग करताना दिसत आहे.
ईशा गुप्ताने या शेयर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘वी मेड इट थ्रू दिसंबर. माझं कुटुंब आणि माझ्या मित्रांच्या निरोगी आयुष्यासाठी मी तुझी आभारी आहे., प्रेम करणाऱ्यांची सोबत मिळाल्याने मी धन्य झालीये. आज रात्री वूल्फ मून साठी तयार. हॅशटॅग बाय २०२०.’
इशा ही अभिनेत्री तर आहेच सोबत ती एक मॉडेल सुद्धा आहे. २००७ मध्ये तिने मिस इंडिया इंटरनॅशनल टायटल स्वतःच्या नावे केलं होतं. आणि त्यानंतर ती बॉलिवूड मध्ये करियर बनवण्यास यशस्वी ठरली आहे. इशाने आतापर्यंत जन्नत २, राझ ३, रुस्तम, कमांडो २, बादशाहो, टोटल धमाल, हमशकल्स, पलटण, वन डे जस्टीस आशा अनेक सिनेमांमधून मुख्य भूमिका साकारल्या आहेत.