Tuesday, August 12, 2025
Home हॉलीवूड मार्वल स्टुडिओजच्या ‘इंटर्नल्स’ सिनेमाने खराब रिव्हीयु मिळूनही केले ताबडतोड कमाई, पहिल्याच आठवड्यात १२०० कोटी कमावले

मार्वल स्टुडिओजच्या ‘इंटर्नल्स’ सिनेमाने खराब रिव्हीयु मिळूनही केले ताबडतोड कमाई, पहिल्याच आठवड्यात १२०० कोटी कमावले

मार्वल स्टुडिओजचा बहुप्रतिक्षित असा ‘इंटर्नल्स’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने धमाका केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकएंडला तब्बल १६१ मिलियन डॉलर अर्थात १२०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढी तुफान कमाई करत या सिनेमाने चित्रपटाबद्दल लावल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अनुमानाने बाजूला सारले आहे. ‘इंटर्नल्स’ सिनेमाला जगभरातील सर्वच समीक्षकांनी आणि सोशल एमडीयावरही खराब रिव्ह्यूज दिले आहेत. मात्र याचा काहीच परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झालेला दिसून येत नाही. ‘शांगची एंड द लेजेंड ऑफ टेन रिंग्स’ आणि’ ‘ब्लॅक विडो’ या मावळच्या दोन चित्रपटानंही ‘इंटर्नल्स’ने मागे टाकले आहे. तर दुसरीकडे जेम्स बॉन्ड सिरीजमधील २५ वा चित्रपट असणाऱ्या ‘नो टाइम टू डाय’ ने जगभरात ५०० मिलियन डॉलरचा व्यवसाय केला आहे.

‘इंटर्नल्स’ हा मावत स्टुडिओजचा २५ वा सिनेमा असून दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अमाप प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाने जवळपास ९०.७ मिलियन डॉलरचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय केला आहे. अमेरिकेत केलेला व्यवसाय धरून या चित्रपटाने १६१.७ मिलियन डॉलर कमावले आहेत. विशेष म्हणजे क्लोए झाओ दिग्दर्शित ‘इंटर्नल्स’ सिनेमा यावर्षी वीकएंडवर सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने  ‘शांगची एंड द लेजेंड ऑफ टेन रिंग्स’ आणि ‘ब्लॅक विडो’ पेक्षा ८ टक्के जास्त ग्लोबल बिजनेस केला आहे.

‘इंटर्नल्स’ चित्रपटाला चीनमध्ये प्रदर्शनासाठी मज्जाव करण्यात आला असूनही या सिनेमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा व्यवसाय केला आहे. चीनमध्ये प्रदर्शित न झालेल्या या सिनेमाने ही भरपाई कोरियामधून केली आहे. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय व्यवसाय करणाऱ्या देशांमध्ये कोरियाचा नंबर पहिला आहे. त्यानंतर यू. के., फ्रांस, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहेत.

भारताबद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमाने ‘सूर्यवंशी’ आणि ‘अन्नाथे’ सिनेमाला जोरदार टक्कर दिली आहे. या चित्रपटाने ८.७५ कोटींची ताबडतोड ओपनिंग केली असून शनिवारी ६.८५ रविवारी ७.२० कोईंचे कलेक्शन केले आहे. जवळपास २२.८० कोटी या सिनेमाने भारतात कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

-काय सांगता! ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमध्ये करायचे नव्हते नवाजुद्दीन सिद्दीकीला काम, स्वत:च सांगितले कारण

हे देखील वाचा