Tuesday, December 17, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हम आप के है कौन’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना आजही येतात भरपूर फोन, कारण आहे खूपच मजेशीर

सलमान खान आणि माधुरी दिक्षीत यांचा ‘हम आपके है कौन?’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट सुपरहिट होण्यासोबतच सलमान खानचे करीअर देखील चांगले झाले होते. सगळ्यांना ही गोष्ट माहित असेल की, सलमान खानचे करीअर बनवण्यात दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा केवढा मोठा हात आहे. सलमानने ‘मैने प्यार किया’ या य।यांच्या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. ‘हम आप के है कौन?’ या चित्रपटातील ‘जुते दो पैसे लो’, ‘माए नी माए’ आणि ‘दीदी तेरा देवर दिवाणा’ या गाण्यांनी सर्वत्र धमाल केली होती.

या चित्रपटात लग्नाच्या सगळ्या विधी खूप चांगल्या पद्धतीने दाखवल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटनंतर सूरज बडजात्या यांना लोक कॉल करून लग्नाच्या विधीबद्दल विचारात असत. याबाबत त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. (Hum aap ke hai koun, people started calling directed reason is so funny)

सूरज बडजात्या यांनी एक मुलाखतीत सांगितले होते की, “मी लग्नात ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या मी माझ्या चित्रपटात वापरल्या. मला आजही लोक कॉल करतात आणि सांगतात की आमच्याकडे हा प्रोग्राम आहे तर यासाठी कोणत्या विधी कराव्या लागतील. तेव्हा मी त्यांना सांगतो की, मी पंडित नाहीये. परिवारासोबत आनंदी असणे, सोबत राहणे आणि सण साजरे करणे हेच मी माझ्या चित्रपटातून दाखवत असतो.”

‘हम आप के है कौन?’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता हा चित्रपट राष्ट्रपती भवनमध्ये देखील दाखवला होता. चित्रपटात सलमान खान, माधुरी दिक्षीत, रेणुका शहाणे, मोह निश बहल, अनुपम खेर रीमा लागू, आलोक नाथ आणि दिलीप जोशी हे कलाकार होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा