Thursday, April 18, 2024

‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात; विकी कौशिलसोबत आहे खास कनेक्शन?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी(Ex Chief Minister Of Maharashtra Manohar) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह बॉलीवूड क्षेत्रातही शोककाळा पसरली आहे. मनोहर जोशी यांचे बॉलीवूड नगरीशी खास कनेक्शन आहे. विशेष म्हणजे, अभिनेता विकी कौशलसोबत त्यांचे फार जवळते नातं मानले जाते. तर कसं काय ते जाणून घेऊयात.

वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून आजवर अनेक कलाकारांनी त्यांची एक छाप सोडली. त्यापैकी एक अशी अभिनेत्री आहे जी मनोहर जोशी यांची नात आहे. तिचं नाव शर्वरी वाघ असं आहे. शर्वरी वाघ ही अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे ती वैयक्तिक आयुष्यामुळं अधिक चर्चेत असते. शर्वरी ही गेल्या काही काळापासून विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. ते दोघं अनेकदा एकत्र दिसतात.

शर्वरी वाघ ही मनोहर जोशींची मुलगी नम्रात वाघची मुलगी आहे. तर शर्वरीचे वडील शैलेश वाघ हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. शर्वरीचा जन्म १४ जून १९९६ रोजी मुंबईत झाला. तिला एक बहिण आहे.

शर्वरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिनं ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘सितारा के तारे’ या चित्रपटात दिसली. त्याशिवाय ती ‘द फरगॉटन आर्मी – आझादी की जंग’ या सीरिजमध्ये दिसली होती. याच सीरिजमध्ये सनी कौशल आणि शर्वरी वाघ पहिल्यांदा स्क्रिनवर दिसले होते. दोघे अनेकदा एकत्र स्पॉटदेखील झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु आहे.

मात्र, शर्वरीने अनेकदा या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मी आणि सनी कौशल दोघंही गेल्या चार वर्षांपासून चांगले मित्र आहोत. सनी आणि माझ्या नात्याविषयी जे काही बोललं जातंय तीही एक अफवाच आहे.’ असं शर्वरीने अनेकदा माध्यमांना सांगितले आहे.

‘माझं ते स्वप्न अपूर्णच…’ वयाच्या ७५ व्या वर्षी जया बच्चन यांनी व्यक्त केली खंत

पुन्हा एकदा त्या गोड चेहऱ्याने गाजवलं सोशल मीडियाचं मार्केट, राहा कपूरचे फोटो व्हायरल

हे देखील वाचा