Thursday, April 25, 2024

काय सांगता! ‘द फ्लॅश’मध्ये पाहायला मिळणार दोन व्हर्जन; इझरा मिलरचा ‘डीसी फँडम’मध्ये खुलासा

चित्रपट जगतासाठी १६ ऑक्टोबर हा अतिशय खास दिवस ठरला. ड्वेन जॉन्सन, जेसन मोमोआ, जॉन सीना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या मदतीने ‘डीसी फॅनडोम २०२१’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम व्हर्च्युअली झाला, ज्याचे थेट कव्हरेज डीसी फॅनडोमच्या वेबसाईटवर झाले. याव्यतिरिक्त हे कव्हरेज यूट्यूबवर झाले. या लाईव्ह कव्हरेजमध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते. यासोबतच चित्रपटांशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. दरम्यान, इझरा मिलरच्या ‘द फ्लॅश’ चित्रपटाचे पहिले फुटेज प्रदर्शित करण्यात आले, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

इझरा मिलरच्या ‘द फ्लॅश’ चित्रपटाचा पहिला टिझर डीसी फॅंडमच्या व्हर्च्युअल फॅन इव्हेंटमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या टिझरमध्ये बॅरी एलन स्वतः एका दुसऱ्या व्हर्जनमध्ये पाहायला मिळाली. त्याचबरोबर साशा कॅल्ले सुपरगर्लचे नेतृत्व करताना दिसली. फुटेजमध्ये मायकल कीटन बॅटमॅन बनल्याची झलकही दाखवली गेली. चित्रपटात वेळ आणि अनेक विश्वांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यात बॅरी एलन आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

एवढेच नाही, तर मिलर या चित्रपटात सुपरहिरोच्या वेगवान गतीने पुढे जाताना दिसणार आहे. तो वेग इतका वेगवान असेल की, तो आगामी चित्रपटात हॉपिंग राईड शोधण्यासाठी जागा आणि वेळेच्या सीमा ओलांडेल.

या चित्रपटाची एक झलक दाखवताना इझरा मिलर म्हणाला की, “आम्ही आमचा चित्रपट दाखवण्यासाठी खूप उत्साहित आहोत. आम्हाला आमच्या चित्रपटाचा टिझर दाखवायचा होता, पण आमच्याकडे पुरेशी संसाधने नसल्याने आम्ही तुम्हाला टिझर दाखवू शकत नाही.” यासह, त्याने हे देखील सांगितले की, हा टिझर खूप रोमांचक असणार आहे. मायकेल कीटनच्या बॅटमॅनची एक झलक आणि मिलरच्या बॅरी एलनच्या दोन वर्जनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुरेशी आहे.

‘द फ्लॅश’ ४ नोव्हेंबर, २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा क्रिस्टीना हॉडसन यांनी लिहिली आहे, ज्यांना ‘बर्ड्स ऑफ प्री’साठी ओळखले जाते. या चित्रपटाच्या एका झलकने आता चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला आहे. आता चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

-Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने

-‘अधूरा’चा फर्स्ट लूक रिलीझ: शेवटचे एकत्र दिसणार ‘सिडनाझ’, चाहत्यांना अनावर झाल्या भावना

हे देखील वाचा