Sunday, June 14, 2026
Home अन्य पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

कॉमेडियन कपिल शर्माचे जानेवारी २०२१ मध्ये काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये कपिल व्हील चेअरवर बसलेला दिसला होता. हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते खूप काळजीत पडले होते. विमानतळावर स्पॉट केल्यानंतर कॉमेडियनने खुलासा केला होता की, जिममध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. पण आता तो बरा होत आहे. त्याच दरम्यान, त्याचा लोकप्रिय टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो’ ऑफ एअर देखील झाला होता. तेव्हा कपिल शर्माने पत्नी गिन्नीच्या दुस-या गर्भधारणेमुळे काही दिवसांसाठी शो बंद केल्याचे म्हटले होते.

पण आता एका व्हिडिओमध्ये कपिल शर्माने खुलासा केला आहे की, त्याने आपला लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ का बंद केला होता. तो गिन्नीच्या गर्भधारणेमुळे नाही, तर पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे केला होता. कपिलने पुढे सांगितले की, सुरुवातीला त्याला २०१५ मध्ये यूएसएमध्ये पाठीची दुखापत झाली होती, परंतु त्याला वेदनांचे खरे कारण माहित नव्हते. जेव्हा त्याने तेथील डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्याने त्याला एपिड्यूरल दिले, ज्यामुळे त्याला आराम वाटला. २०२१ मध्ये त्याच्या पाठीला पुन्हा दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याची समस्या वाढली. ‘जागतिक स्पाइन डे’च्या निमित्ताने कपिलने त्याच्या पाठीच्या दुखापतीबद्दल आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल हा मोठा खुलासा केला आहे. कपिलने सांगितले की, जानेवारी २०२१ मध्ये जेव्हा त्याला पुन्हा दुखापत झाली तेव्हा त्याला त्याच्या अनेक योजना रद्द कराव्या लागल्या होत्या.

कपिल म्हणाला की, “मला २०२१ मध्ये पुन्हा समस्या आली. माझ्या अनेक योजना होत्या, पण सर्व थांबवावे लागले. या दुखापतीमुळे मला माझा शो ऑफ एअर करावा लागला. या वेदनेमुळे, तुमचे वर्तन बदलते, तुम्ही असहाय्य वाटू लागता कारण तुम्ही अंथरुणावरुन उठू शकत नाही आणि मग लोक तुम्हाला सांगू लागतात की, सर्व वेळ पडून राहिल्याने तुमचे वजन वाढेल. आपण लिक्विड डाएट सुरू केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला आधीच वेदना होत असतील आणि कोणी तुम्हाला खाण्यासाठी सलाद दिले, तर तुमची वेदना दुप्पट होईल. मला खूप त्रास सहन करावा लागला आहे.”

यावर्षी कपिल शर्माचा शो ऑफ एअर झाला आणि त्याच्या काही काळानंतर नवीन सीझन सुरू झाला आहे. त्यानंतर कपिल म्हणाला की, त्याने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये आलेला सैफ अली खान सेट पाहून झाला नाराज म्हणाला…

हे देखील वाचा