Saturday, July 6, 2024

Fact Check | अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल? बॉबी देओलने दिले हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येताच, त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, अभिनेत्याची प्रकृती गंभीर आहे. मात्र, या बातम्यांदरम्यान धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलचे (Bobby Deol) वक्तव्य समोर आले आहे. बॉबीने चाहत्यांना वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

सगळ्या आहेत अफवा?
अभिनेत्याने या अफवांचे खंडन केले असून, त्याचे वडील घरी असल्याचे स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, “धर्मेंद्र पूर्णपणे ठीक आहेत. त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत आहे. यासाठी मी त्यांच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. तुमचे प्रेम आणि स्नेह असेच राहू द्या.” (fact check bobby deol refutes rumours of dharmendra being hospitalised and critical)

मे महिन्याच्या सुरुवातीला धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर अभिनेत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओद्वारे खुलासा केला की, त्याच्या पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आल्याने त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “मित्रांनो, जबरदस्तीने गोष्टी करू नका… तुमच्या मर्यादा जाणून घ्या, मी हे केले आणि माझा धडा शिकलो.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर धर्मेंद्र लवकरच करण जोहरच्या (Karan Johar) ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत आलिया भट्ट (Alia Bhatt), रणवीर सिंग (Ranveer Singh), शबाना आझमी (Shabana Azmi) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा

हे देखील वाचा