‘इमली’ फेम फहमान खान याने ‘आर्यन सिगं राठोड’ नावाच्या भूमिकेतून अनेक लोकांचे मनं जिंकले आहेत. या मालिकामध्ये सुंबुल तौकीर (Sumbul Taukir) उर्फ इमली यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंद केले होते. यांच्यामध्ये असणारी केमिस्ट्री सगळ्यांना खूपच आवडली होती. हे दोघे वैयक्तीक आयुष्यातही खूप चांगले मित्र आहेत. नुकतंच यांची मालिका संपल्यानंतर सुंम्बुलने बिग बॉस16 मध्ये हजेरी लवली आहे. या कर्यक्रमामध्ये ती सगळ्यात लहान स्पर्धक आहे. यावर तिचा मित्र फहम याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
इमली मालिका संपल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता, पण संबुल आणि फहमान एकत्र बिग बॉस 16 ची ऑफर आली होती. मात्र,फहमानला काही कारणामुळे बिग बॉसचा भाग बनता आले नाही. पण आपल्या जिवलग मैत्रिणिला खेळताना पाहून तो खूप खुश आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलखतात सुंबुल आणि त्याच्यासोबतच्या मैत्रिचा किस्सा सांगत बिग बॉस16 मध्ये शालिन बद्दलही मोठे वक्तव्य केले आहे. त्याला शालिन आणि सुंबुलच्या नात्यावरही नाराजी व्यक्त केली आहे.
मालिका संपल्यानंतर फहमानने एक हप्त्याचा ब्रेक घेउन नुकताच घरी परतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्याने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आपली मैत्रिण सुंबुलसोबत असलेल्या केमिस्ट्रीबद्दल सांगितले की, माझी आणि सुंबुलची केमिस्ट्री खूप चांगली आहे. आमची मैत्री एवढी चांगली आहे की, भविष्यात आम्ही पुन्हा एकदा एकत्र मालिका करु शकतो. आमचे खूप चांगले कनेक्शन आहे. जेव्हा दोन लोकांमध्ये अशी मौत्री असते, तेव्हा ते एकमेकांना डेट करतात. मात्र, आमच्यामध्ये असे काही नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत, एकमेकांना चांगल्या प्रकारे समजतो आणि तेवढाच आदरही करतो.
इमली मालिकेच्या शुटिंगवेळी यांच्या मेत्रीवर अनेक अफवा उठल्या होत्या होत्या की, सुंम्बुल आणि फहमान एकमेकांना डेट करत आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात हे खूप चांगले मित्र आहेत. फहमानला मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला होता की, शालिन आणि सुम्बुलच्या मैत्रि बद्दल तुझे काय मत आहे? तेव्हा त्याने सांगितले की, “ती खूपच सामर्थ्यवान मुलगी आहे सोबतच भानिकही आहे. ती जशी आहे तसंच गेम खेळत आहे. जर तिने आपले भावनिक होणे थोड कमी केलं तर ती अजून चांगलं खेळेल. त्याने पुढे सांगितले की, जेव्हा तुम्ही एका घरात 60 दिवस राहत आहेत,तर तुम्हाला असा मित्र हवा असतो जो तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्हा तुमच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून एवढे लांब कसे राहू शकता? आणि तेही कोणत्याच संपर्काशिवाय. जर तिला त्या घरात जास्त दिवस टिकायचे असेल तर इतरांबरोबर चांगले राहण्यासोबतच चांगली मैत्रिही करावी लागेल.”
पहायला गेलं तर बिग बॉस 16 सुरु झाल्यापासून सुम्बुल नेहमी शालिनच्या मागेच फिरत असते. त्यामुळे तिच्या चाहत्याने तिला शालिन सोबत प्रेम झाले आहे का? असे म्हणत ट्रोलही केले होते. जर शालिन आणि ती बोलत असतील जर यांच्यामध्ये कोण आलं तर तिचा चेहरा लगेच बिघडल्यासारखा होते. त्यामुळे सुम्बुलची अशी वर्तवणुक तिच्या चाहत्यांना नाराज करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी ‘गुड्डू भैय्या’कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा
‘३ इडियट्स’ चित्रपटात काम केल्यानंतर अली फजल खरंच बनला होता डिप्रेशनचा शिकार; ‘हे’ होते कारा