एकेकाळी ‘गुड्डू भैय्या’कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा

एकेकाळी 'गुड्डू भैय्या'कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा


सोशल मीडियावर नेहमीच कोणता ना कोणता ट्रेंड सुरुच असतो. मागील काही दिवसांपासून ट्विटरवर ‘फर्स्ट सॅलरी’ हा ट्रेंड सुरु असल्याचे दिसून येत आहे. या ट्रेंडमध्ये अनेकजण सहभागी होत, आयुष्यातील स्वतःची पहिली सॅलरी काय होती, ते शेअर करत आहे.

पहिल्या पगाराबाबतचा हा ट्रेंड बॉलिवूडमधील अनेक सेबेल्सला आवडला असून ते देखील यात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यातच आता ‘मिर्झापूर’ वेबसिरीज फेम ‘गुड्डू भैय्या’ म्हणजे अभिनेता अली फजल हा देखील सामिल झाला आहे.

पहिल्या पगाराबाबत प्रत्येक व्यक्तिच्या काही खास भावना जोडलेल्या असतात. त्यामुळेच ट्विटरवर या गोष्टीला शेअर करताच अली फजलच्या संघर्षाची कहानी देखील चाहत्यांसमोर आली आहे.

अली फजलने त्याच्या पहिल्या कमाईबाबत या ट्रेंड दरम्यान खुलासा केला आहे. त्याने यावेळी व्यक्त होताना सांगितले की, त्याचा पहिला पगार हा ‘रुपये ८ हजार’ इतका होता. तसेच त्याने त्याच्या पगाराबाबत खुलासा केल्यानंतर त्याच्या आयुष्यातील प्रारंभीच्या भुमिकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

एकेकाळी कॉल सेंटरमध्ये काम करत होता ‘गुड्डू भैय्या’….

अलीला त्याच्या प्रारंभीच्या आयुष्यात खुपच संघर्ष करावा लागला. तो सुरुवातीला एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याने त्याचे हे पैसे कॉलेजची फी भरण्यासाठी जमा केले होते. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबाकडे पैसे नसल्याने त्याला नाईलाजास्तव काम करावे लागत होते.

मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये अली फजलने ‘गुड्डू पंडित’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची ही भुमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. लॉकडाऊन काळात याच वेबसिरीजने अलीला घराघरात पोहोचवले. त्यामुळे ‘मिर्झापूर’ वेब सीरिज अलीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरताना दिसत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.