Saturday, June 29, 2024

CWC 2023 Final: ‘टायगर 3’च्या कार्यक्रमात सलमान खान म्हणाल, ‘यंदाचा वर्ल्डकप…’

जगभरातील क्रिकेटप्रेमी येत्या रविवारची वाट पाहत आहेत. या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे.तर सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित ‘टाइगर 3‘ चित्रपट 12नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. मात्र, आता हळूहळू चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विश्वचषक स्पर्धा सुरू असताना आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टाइगर 3’ (tiger 3)  प्रदर्शित करण्याचा चांगलाच फटका सलमान खानला बसला आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट लाँग वीकेंडला प्रदर्शित न करता दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, चित्रपटाच्या कमाईत होणारी घट पाहता हा निर्णय चुकीचा ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात सलमान खानने याविषयी भाष्य केले. “आतापर्यंतचा प्रत्येक सामना भारतीय संघाने जिंकलेला आहे. याशिवाय हा वर्ल्डकप सुरू असताना आमच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतीय संघ नक्कीच जिंकेल आणि त्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळतील,” असं भाकित बॉलीवूडच्या भाईजानने केले आहे.

दरम्यान, टाइगर ३ चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 300 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. यामध्ये सलमान खान-कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असून इम्रान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची शाहरुख खानच्या जवान चित्रपटाशी तुलना केली असता पहिल्या तीन दिवसांच्या कमाईचे आकडे खूपच कमी आहेत. जवान चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जगभरात एकूण 380 कोटींहून अधिक गल्ला जमवाल होता. (famous actor salman khan visit tiger 3 fan event in mumbai and says india will win the world cup this year)

आधिक वाचा-
म्हणून बॉलिवूड पार्टीला जात नाही इमरान हाश्मी; म्हणाला, ‘मी दारू पीत नाही ना…’
वाहतूक कोंडीत अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, गाडीत केले ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर Video व्हायरल

हे देखील वाचा