Tuesday, May 28, 2024

वाहतूक कोंडीत अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, गाडीत केले ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर Video व्हायरल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्या सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असतात. त्यामुळे त्या चर्चेत येत असतात. अमृता फडणवीस यांनी नुकताच एका मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या एका कार्यक्रमाला जात असताना रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे त्यांचे वाहन अडकले होते. त्यावेळी त्यांनी गाडीतच डान्स केला.

अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. रिल्स व्हिडीओ, फोटो, गाणी याबरोबरच त्या अनेक सामाजिक विषयांवर आपलं मत मांडतात त्यामुळे त्या सतत चर्चेत येत असतैत. सध्या त्यांचा एक रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर त्या गाडीत बसून डान्स करताना दिसत आहेत. “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अमृता फडणवीसांनी गाडीत बसून डान्स केल्याने सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या डान्सचे कौतुक केलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी त्यावर टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

या व्हिडीओला एका दिवसात 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पण अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “हे असलं गरजेचं आहे का?” दुसऱ्याने लिहिले की “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…” तर आणखी एकाने लिहिले की. “ही पोस्ट डिलिट करा अमृता ताई” अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Amrita Fadnavis wife of Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis performed an amazing dance in the car)

आधिक वाचा-
हर्षवर्धन कपूरने डेव्हिड बेकहॅमसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर झाला ट्रोल, अभिनेत्याने दिले चोख प्रत्युत्तर
म्हणून बॉलिवूड पार्टीला जात नाही इमरान हाश्मी; म्हणाला, ‘मी दारू पीत नाही ना…’

हे देखील वाचा