Monday, July 1, 2024

शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिल खास सरप्राईज; बहुप्रतीक्षित ‘डंकी’चा टीझर प्रदर्शित, एकदा पाहाच

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान 2 नोव्हेंबर रोजी त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याने आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. 2023 हे वर्ष बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसाठी खूप खास होते. या वर्षी त्याचे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट बॅक टू बॅक रिलीज झाले. पण शाहरुखची करमणूक अजून संपलेली नाही. पठाण आणि जवाननंतर आता तो डिसेंबरमध्ये ‘डंकी’या चित्रपटातून पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

शाहरुखचे (shahrukh khan) चाहते गेल्या बऱ्याच महिन्यांपासून या चित्रपटाच्या टीझरची वाट पाहत होते. अखेर आज तो टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरमध्ये शाहरुख एका नवीन लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या या लूकला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे. ‘डंकी’ हा एक मलयालम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू आणि जॉन अब्राहम देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा टीझर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही साध्या, सरळ व खऱ्या लोकांच्या स्वप्नपूर्तीची कहाणी आहे. त्यांची मैत्री, त्यांच्यातील प्रेम आणि एकमेकांना धरून राहण्याची त्यांची वृत्ती याची ही गोष्ट आहे. या चित्रपटाशी जोडला जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” ‘डंकी’चा टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांनी टीझरवर खूप प्रेम व्यक्त केलं आहे.

 नेकांनी टीझरला ‘शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वात चांगला लूक’ असल्याचं म्हटलं आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर 5 मित्रांची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. टीझरच्या सुरुवातीला शाहरुख खान वाळवंटात धावताना दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी काही लोकही आहेत. काही शूटर त्यांना शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. ते परदेशात जायला निघाले आहेत. शाहरुख आपल्या मित्रांसोबत परदेशात पोहोचू शकतो की नाही, याभोवती कथा रचण्यात आली आहे. (famous actor shahrukh khan upcoming movie dunki drop 1 teaser out now)

आधिक वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याची मराठा आरक्षणासंदर्भात रोखठोक पोस्ट; म्हणाला, ‘तुम्ही एक नंबरचे मूर्ख आणि..’
करवा चौथनिमित्त ‘या’ अभिनेत्रींचा खास लूक, पाहा खास फोटो

हे देखील वाचा