Thursday, June 18, 2026
Home बॉलीवूड शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; अभिनेता हात जोडून म्हणाला…

शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; अभिनेता हात जोडून म्हणाला…

बॉलीवूडचा बादशाहचा अर्थात शाहरूख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. शाहरूखचे लाखो चाहते आहेत. बॉलीवूडचा बादशाह किंग खानचा 2 नोव्हेंबरला 58वा वाढदिवस आहे. सुपरस्टार शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांनी मध्यरात्री प्रचंड गर्दी केली. शाहरुखनेही मध्यरात्री बाहेर येत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. शाहरुखच्या बंगल्याबाहेरचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानला ( shahrukh khan) शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेर तुफान गर्दी केली होती. हातात पोस्टर घेऊन, फुलहार घेऊन, कॅमेरे घेऊन चाहते बाहेर उभे होते. गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये अगदी लहान मुलं, तरुण, महिला व पुरुषांचाही समावेश होता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुखने निराश केलं नाही. त्याने बाहेर येत हात जोडून सर्वांचे आभार मानले. चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ‘मन्नत’बाहेरचे फोटो व व्हिडीओ आल्यानंतर चाहते त्यावर कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 दरम्यान, घराबाहेर चाहते जमल्यानंतर शाहरुखने सोशल मीडियावर पोस्टही केली. “तुमच्यापैकी बरेच जण रात्री उशिरा येतात आणि मला शुभेच्छा देतात हे अविश्वसनीय आहे. मी फक्त एक अभिनेता आहे. मी तुमचं थोडं मनोरंजन करू शकेन यापेक्षा जास्त आनंद मला दुसरी कोणतीच गोष्ट देत नाही. तुमच्या या प्रेमाच्या स्वप्नात मी जगतो. मला तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद,” अशी पोस्ट त्याने मध्यरात्री केली.

शाहरुख खानच्या 58व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरही त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. इतर सेलिब्रिटीही शाहरुखवर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (Watch the video of fans crowding outside the Mannat bungalow at midnight to wish Shahrukh Khan)

आधिक वाचा-
हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप; बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू
‘सत्यशोधक’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

हे देखील वाचा