Wednesday, June 26, 2024

दिवाळीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘आपली मनमानी करून चालत नाही…’

दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीतील महत्वाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने लोक आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवतात, गोडधोड पदार्थांचा आनंद घेतात आणि दिव्यांची रोषणाई करतात. यावर्षी देखील दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि गोडधोड पदार्थांचा आनंद घेतला जात आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी देखील दिवाळीच्या आनंदात गुंतली आहे. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने दिवाळीच्या सणाबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेमांगी कवीने (Hemangi Kavi )पोस्ट करताना लिहिले की, “दरवर्षी प्रमाणे यंदाही. मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच. खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून.

प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना स्पेशल असतो. पण मग इतक्या सर्व ऑफशन मधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या. लय कटीन. म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं is altogether different game भाई.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही. मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो. निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी. तुम्ही करता का असं?”असं म्हणत तिने लोकांना प्रश्न विचारला आहे. हेमांगीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Famous actress Hemangi Kavi special post on the occasion of Diwali is in discussion)

आधिक वाचा-
बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी त्यांची दिवाळी कशी साजरी करतात? एकदा वाचाच
ना ईद, ना दिवाळी…’हे’ बॉलीवूड सेलिब्रिटी कुठलेच सणवार करत नाहीत साजरे, वाचा यादीतील नावे

हे देखील वाचा