Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘राज ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेले ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर करत तिखट ट्वीट केलं होतं. ज्यानंतर तेजस्विनीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरची ब्लू टिक हटवली गेली होती. या प्रकरणामुळे तेजस्विनी चांगलीच चर्चेत आली होती.

याआधी तेजस्विनीने (Tejaswini Pandit ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास ट्वीट केलं होतं. ज्यात तिने राज ठाकरेंचं भरभरुन कौतुक केलं होतं. या ट्वीटमुळेही तिची चांगलीच चर्चा झाली होती. नुकतंच एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीने या ट्वीटविषयीचं स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी तिला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होईल का? या प्रश्नाचं उत्तर विचारण्यात आलं. तेव्हा तेजस्विनी म्हणाली, “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ते एक कुशल नेते आहेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगली योजना आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होईल असा मला विश्वास आहे.”

तेजस्विनी पुढे बोलताना म्हणाली की, “कुठल्याही मराठी माणसाला कधीही कुठल्याही बाबतीत कुठलीही समस्या आली, तर पहिलं नाव आणि पहिला दरवाजा कुठला ठोठावला जातो तो म्हणजे शिवतीर्थाचा, जो राज साहेबांचा आहे. कारण तो माणूस सातत्याने मराठी माणसासाठी काम करतोय. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करतोय. मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे.” तेजस्विनीच्या या स्पष्टीकरणामुळे आता या प्रकरणावर पडदा पडला आहे. (Famous actress Tejaswini Pandit wants to see Raj Thackeray become Chief Minister)

आधिक वाचा-
मिलिंद गवळी इंस्टाग्रामवर कोणाला फॉलो का करत नाही? अभिनेता म्हणाला, ‘… गरज नाही’
अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’च्या कमाईत मोठी घट, 16व्या दिवशीचे कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा