Saturday, July 27, 2024

‘आदिपुरुष’मधील डायलाॅगवरुन होणाऱ्या टीकेवर तेजस्विनी पंडितने सोडल मौन, म्हणाली, “वाद निर्माण करण्यासाठी…”

प्रभास स्टारर ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट 16 जूनला देशभरात प्रदर्शित झाला आहे. याची सोशल मीडियावर तूफान चर्चा होत आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. पण अनेक युझर्स या चित्रपटावर जोरदार टिका करत आहेत. या चित्रपटातील डायलाॅग प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. त्या चित्रपटातील डायलाॅगवर अनेक अक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत.

आदिपुरुष‘ हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. अनेकांचा याला कडाडून विरोध होत आहे. असे असूनही हा चित्रपट कमाईच्या बाबतीत विक्रम मोडत आहे. या चित्रपटात अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने (Tejaswini Pandit) साकारली आहे. या चित्रपटावर अनेक सेलिब्रेटी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात काही मराठी कलाकारांनी काम केल आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली की, “आदिपुरुष चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मी रावणाची बहिण शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा मला एक भाग होता आला. ही गोष्ट माझ्यासाठी बाल फार आनंदाची आहे.”

तसेच ती पुढे बोलताना म्हणाली की, “आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते या चित्रपटातील डायलॉग बदलण्याच काम करत आहेत. मला वाटत की हा खूप चांगला निर्णय आहे. आदिपुरुष हा चित्रपट कधीच कोणत्या वाद निर्माण होण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही.”

‘आदिपुरुष’ चित्रपट सुमारे 600 कोटींच्या प्रचंड मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. मात्र, हा चित्रपट सध्या अडचणीत सापडला आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. (Tejaswini Pandit broke silence on the criticism of the dialogue in ‘Adipurush’)

अधिक वाचा-  
अभिनेत्री प्राजक्ताच्या माळीच्या लूकने चाहते घायाळ; फोटोवर कौतुकांचा वर्षाव
‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनची मागणी, कारणही सांगितलं!

हे देखील वाचा