Sunday, April 14, 2024

काळजाला चटका लावणारी बातमी! प्लास्टिक सर्जरीमुळे अभिनेत्री ‘जॅकलिन’चे निधन; जगभरातील चाहते शोकसागरात

सुंदर दिसणे हे एक अलिकडच्या काळात वेड बनले आहे. सेलिब्रिटींसाठी सौंदर्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली आहे. डोळ्यांपासून नाक आणि ओठांपर्यंत अभिनेत्री स्वतःला परफेक्ट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा अवलंब करत आहेत. अनेक वेळा या प्लास्टिक सर्जरीमुळे त्यांचा जीव जातो. नुकतेच प्लास्टिक सर्जरीमुळे एका अभिनेत्रीने तिचा जीव गमावला आहे.

मॉडेलिंग आणि अभिनयाच्या दुनियेत जॅकलिन एक प्रसिद्ध चेहरा होती. पण सुंदर दिसण्यासाठी तिने वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन कॅरीरी हिचे निधन झाले आहे. जॅकलीनचे वयाच्या 48 व्या वर्षी कॉस्मेटिक सर्जरीमुळे कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तिच्या आकस्मिक निधनाचे कारण कॉस्मेटिक सर्जरी प्रक्रियेदरम्यान रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे सांगितले जाते.

जॅकलिनच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी तिची मुले क्लो आणि ज्युलियन त्यांच्या आईसोबत होते. तिच्या निधनाने जॅकलिनचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तिच्या प्रियजनांनाही मोठा धक्का बसला आहे. सॅन राफेल वेंडिमियाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जॅकलिनच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली आहे . पोस्टमध्ये जॅकलिनच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी लिहिले की, “आज आम्ही आमच्या फॉलोअर्सना ही दुःखद बातमी सांगू इच्छितो. 1996 मध्ये पुंता डेल अगुआ जिल्ह्याची राणी आणि विभागीय व्हाइसरॉय असलेल्या जॅकलिन कॅरीरी यांचे निधन झाले आहे.”

जॅकलीनने ब्युटी क्वीन जिंकला होता. ती 1996 मध्ये अर्जेंटिनामधील San Rafael en Vendimia grape harvest festival सौंदर्य स्पर्धेची उपविजेती होती.कॅरीरी यांचे निधन चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी एक महान अभिनेत्री गमावली आहे. (Famous Argentinian actress Jacqueline Carriri has passed away)

आधिक वाचा-
आई-वडिलांच्या ‘या’ निर्णयामुळे पलक तिवारी गेली होती खचून; वाचा तिचा जीवनप्रवास
‘जॉनी मेरा नाम’च्या सेटवर हेमा मालिनीने केलेली ‘ही’ मोठी चूक, अभिनेत्री देव आनंदसमोर लाजून लाल

हे देखील वाचा