मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. पंजाबी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन, कवी आणि लेखक सुरिंदर शर्मा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंजाबी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. सुरिंदर शर्मा यांनी अनेक सिनेमा आणि कॉमेडी शोमध्ये काम कले होते. सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूनंतर पंजाबी सिनेसृष्टीला दुसरा धक्का बसला आहे.
कॉमेडियन सुरिंदर शर्मा यांच्या निधनाची (Comedian Surinder Sharma Died) बातमी समोर आल्यानंतर पंजाबी इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तसेच, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थनाही करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत अनेक पंजाबी कलाकारांनी मोठ्या पडद्यावर काम केले आहे.
निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट
गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याच्या निधनाच्या दु:खातून बाहेर आले नसतानाच आता पंजाबी सिनेसृष्टीला सुरिंदर शर्मा यांच्या रूपात आणखी एक धक्का बसला आहे. सुरिंदर शर्मा यांच्यावर सोमवारी (दि. २७ जून) चंदीगडच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातील. मात्र, त्यांच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कशातून केली होती कारकीर्दीची सुरुवात?
सुरिंदर शर्मा यांनी खूप कमी वयात त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. नाटकांपासून ते चित्रपट आणि शोमध्येही त्यांनी काम केले होते. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले होते. पंजाबच्या विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. सुरिंदर यांनी ‘सत श्री अकाल’यामधून त्यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ते ‘जट्ट दी’, ‘अनख जत्तन दी’, ‘आंखिली मुटियार’, ‘देसी रोमियो’ यांसारख्या अनेक पंजाबी सिनेमात झळकले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-