Monday, June 9, 2025
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये जबरदस्त ट्विस्ट, लवकरच होणार एका कपलची एन्ट्री

‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये जबरदस्त ट्विस्ट, लवकरच होणार एका कपलची एन्ट्री

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात विवादित शो म्हणून ‘बिग बॉस’ हा शो ओळखला जातो. नुकतेच बिग बॉस या शोचे नवीन ओटीटी पर्व सुरू झाले. अतिशय दिमाखदार सोहळ्यात १३ स्पर्धकांनी या घरात एन्ट्री घेतली आहे. आता सुरू झालेल्या बिग बॉसचे मोठे आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटीवर सुरू झाले आहे. प्रेक्षकांना ते २४ तास बघता येणार आहे. या पर्वाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे करण जोहर. पहिल्यांदाच करण जोहर बिग बॉसचे सूत्रसंचालन करताना दिसणारा आहे.

बिग बॉसचे हे पर्व लोकप्रिय करण्यासाठी मेकर्स अनेक ट्विस्ट आणण्याचा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यातच या शोमध्ये एक नवीन एन्ट्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ‘वूट’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. जी पाहून सर्वांनाच प्रश्न पडतोय, आता या शोमध्ये कोण कपल येणार? ‘वूट’ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो फक्त सावलीचा आहे, कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नाही, आणि नक्की कोण येणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. फोटोखाली लिहिले आहे, “बिग बॉस ओटीटीमध्ये येत आहे, बॉस जोडी. ओळखा पाहू.” (famous couple will enter in bigg boss ott)

या फोटोसोबतच ‘वूट’कडून कॅप्शन देण्यात आले आहे की, “बिग बॉस ओटीटीचा पहिल्या रविवारचा वार होणार आहे, सुपर मनोरंजक, जेव्हा येणार बिग बॉसची ही प्रसिद्ध जोडी. ओळखा पाहू कोण आहे?” ‘वूट’च्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक जोड्यांची नावे घेतली आहे, त्यात सिद्धार्थ आणि शेहनाझ, अली गोनी आणि जास्मीन भसीन आदी जोड्यांची नावे पुढे येत आहेत. त्यातही सिद्धार्थ आणि शेहनाझ यांचे नाव आघाडीवर आहे.

बिग बॉसच्या या पर्वात नेहा भसीन, रिद्धिमा पंडित, करण नाथ, दिव्या अग्रवाल, राकेश बापट, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, अक्षरा सिंग आदी अनेक कलाकार सहभागी झाले असून, पहिले सहा आठवडे हा शो ओटीटीवर दिसणार आहे. त्यानंतर हा शो टीव्हीवर दिसेल. टीव्हीवर प्रदर्शित झाल्यानंतर या शोला पुन्हा सलमान खान होस्ट करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा