Friday, July 5, 2024

क्रिकेटर्ससोबत लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी ठोकला अभिनयाला रामराम

अनेकदा बाॅलिवूड मधील कलाकार अफेअरमुळे चर्चेत येतात. क्रिकेट आणि बाॅलिवूडचे नाते फार जुने आहे. बरेच खेळाडू हे बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. काहींचे नाते लग्नापर्यंत पोहचते , तर काहींचे नाते मधेच संपुष्टात येते. ज्या खेळाडूंचे नाते लग्नापर्यंत गेले, त्यातलीच एक लोकप्रिय आणि आताच्या काळातील जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. अनुष्का सध्या तिच्या मदरहूडमध्ये व्यस्त असली तरी ती बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिचे एक प्राॅडक्शन हाऊस देखील आहे. पण काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी क्रिकेटर्सशी लग्न केले आणि बॉलीवूडला राम राम ठोकला. ज्या अभिनेत्रींनी लग्नानंतर अभिनय सोडला आणि संसाराकडे लक्ष केंद्रीत केले. चला तर मग पाहूयात या अभिनेत्री आहेत तरी कोण?

नताशा स्टॅन्कोविक
टिम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिक पांडेची पत्नी अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक आहे. नताशाने अनेक हिट गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिने २०१४ मध्ये आलेल्या ‘सत्याग्रह’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने वेब सीरिजमध्येही काम केले. नताशाने लग्नानंतर अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. ती सध्या कोणत्याही चित्रपटासाठी काम करत नाही. घर आणि मुलाला सांभाळत आहे.

संगीता बिजलानी
भारती क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी १९९६ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर मोहम्मदने अभिनेत्री संगीत बिजलानीसोबत लग्न केले. त्यानंतर ती पुन्हा कधीही ऑनस्क्रिन दिसली नाही.

हेजल कीच
सलमान खानसोबत ‘बाॅडीगार्ड’ चित्रपटामध्ये दिसलेल्या हेजलने युवराज सिंगसोबत २०१६मध्ये लग्न केले. हेजल ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. तिने ‘बनके की क्रेजी बारात’ या चित्रपटात आयटम साँग केले. लग्नानंतर हेजल कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

गीता बसरा
फिरकीपटू हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसरासोबत २०१५ मध्ये लग्न केले. गीता देखील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी लग्नानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे. आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१५ मध्ये गीताने आणि हरभजन यांनी लग्न केले. गीता २०१६ मध्ये पंजाबी चित्रपट ‘लॉक’ मध्ये शेवटची काम करताना दिसली.

सागरिका घाटगे
भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानने २०१७ साली बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले. त्याच वर्षी सागरिका शेवटची ‘इदासा’ चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने आपल्या अभिनय कारकिर्दीलाही निरोप दिला. सागरिकाने शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट ‘चक दे ​​इंडिया’ मध्ये काम केले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा