प्रसिद्ध युट्यूबर आणि सेलिब्रिटी आशिष चंचलानीची बॉलिवूडधील अनेक कलाकारांशी चांगली मैत्री आहे. यापैकीच एक म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी होय. रोहितने आशिषला भेटण्याचे वचन दिले होते, हे वचन आता रोहितने पूर्ण केले आहे. रोहितच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.
रोहित आपल्या शानदार गाड्यांचा ताफा घेऊन उल्हासनगर येथे पोहोचला, जिथे आशिषच नाही, तर जवळपास राहणाऱ्या सर्व लोकांनी त्याचे धडाक्यात स्वागत केले. (Famous Director Rohit Shetty Came Ulhasnagar To Meet His Friend And Popular Youtuber Ashish Chanchlani Video Viral)
आशिषने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शेट्टी आणि आशिष चंचलानीभोवती जबरदस्त गर्दी झाल्याचे दिसत आहे. आशिषच्या या व्हिडिओला एका दिवसातच ११ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ६० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत आशिषने लिहिले आहे की, “खोलीत बसून व्हिडिओ बनवण्यापासून ते रोहित शेट्टीला उल्हासनगरपर्यंत घेऊन येईपर्यंत आयुष्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. माझे सर्व कुटुंब आज खूपच भावुक झाले आहे. काय दिवस आहे.”
आशिषने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “धन्यवाद रोहित शेट्टी, आपले वचन पूर्ण करण्यासाठी. तुम्ही जे सुंदर काम केले आहे, त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ शकला असता. मातर, तुम्ही सर्वप्रथम आपल्या सिनेमाची निवड केली. तुम्ही लोका आणि त्यांच्याशी नात्याची काळजी घेता. त्यामुळेच सर्व लोक तुमच्यावर प्रेम आणि तुमचा सन्मान करतात.”
युट्यूबवर आशिष चंचलानीचे २६.८ मिलियनपेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. दुसरीकडे इंस्टाग्रामवर अनेक कलाकारांपेक्षा अधिक जवळपास १२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
नुकतेच रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे, प्रदर्शित होताच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल
-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम