Thursday, April 18, 2024

मानसी नाईकचा प्रसिद्ध रिल स्टारबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “नशिब काढलंस…”

मराठी मनोरंजनविश्वातील ऐश्वर्या राय म्हणून अभिनेत्री मानसी नाईकला ओळखले जाते. मागील खूप दिवसांपासून मानसी नाईक तिच्यावर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्री मानसी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मानसी नेहमी तिच्या नृत्य कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मानसी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील मोठ्या प्रमाणावर लाईमलाइटमध्ये येत असते.

मानसी (Manasi Naik) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मानसीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. मानसीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरून लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. अशातच आता मानसीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने रिलस्टार तन्मय पाटेकरसोबत एक रिल व्हिडिओ बनवला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओच बॅकग्राऊंड गाणी आणि कॅप्शन सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तन्मय आणि मानसीने एक रोमँटिक व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओमध्ये चक्क मानसी तन्मयला मुलींना मिठीत कसे घ्यायचे हे शिकवत आहे.

मानसीच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्याचे बोल ऐकू येत आहे. व्हिडिओ शेअर करताना तन्मयने लिहिले की, तुमच्या मागणीनुसार आम्ही दोघांनी एकत्र रिल बनवली आहे. आम्हाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? असा प्रश्नही तन्मयने चाहत्यांना विचारला आहे.

मानसी नाईक आणि तन्मयच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “नशीब काढलंस पोरा.” दुसऱ्याने लिहिलं की,“भविष्यात भारतातील मराठी चित्रपट निर्माते तू असणार आहेस मित्रा, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!” (famous marathi actress manasi naik special video with reel star tanmay zatekar see video)
अधिक वाचा- 
निया शर्माच्या हाॅट लूकने चाहत्यांना भुरळ! फोटो गॅलेरी पाहाच
‘टाइमलेस ब्यूटी’ रवीना टंडनने शेअर केले लेटेस्ट फोटो, एकदा पाहा 

हे देखील वाचा