Thursday, June 13, 2024

‘या’ अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम? चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘मी अभिनय…’

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप चांगलीच चर्चेत आहे. ती आता अभिनयातून कायमचा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीणाने तिच्या करिअरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. वीणा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

वीणाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिने केलेल्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंट वर्षाव करत असतात. नुकतेच वाणीने (Veena Jagtap ) एका मुलाखतीमध्ये तिच्या करियर विषयी खुलासा केला आहे. ती आता तिच्या करिअरमध्ये एक नवीन टप्पा सुरू करत आहे.

“आतापर्यंत ती मुख्यत्वे मराठी मालिकांमध्ये काम करत होती. काही दिवसांपूर्वी वाणीने मेकअपचा कोर्स केल्यानंतर एका चॅनलने मी अभिनय क्षेत्रातून कायमचा ब्रेक घेणार अशी बातमी दिल होती. त्यामुळे ती पुन्हा अभिनय क्षेत्रात दिसणार नाही अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी या घटनेची सखोल माहिती कोणत्याही वृत्तपत्राने काढली नव्हती. त्यामुळे अफवा पसरत गेली,”असे वाणीने सांगितले आहे.

वीणाने पुढे बोलताना सांगितले की, “मी अभिनय सोडलेला नाही. मध्यंतरी मी ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. तिने आतापर्यंत ज्या भूमिका केल्या आहेत, त्या भूमिकांमध्ये ती नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत आली आहे. तिला नेहमीच नवीन गोष्टी करायला आवडतात. मी मध्यंतरी प्रोफेशनल मेकअप शिकली आहे. पण याचा अर्थ असा नाही कि ती आता अभिनय सोडून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणार आहे.”

वीणाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली. वीणाने ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामध्ये देखील सहभाग घेतला होता. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते.  (Famous Marathi actress Veena Jagtap has reacted to the rumors that she has left the acting field)

आधिक वाचा-
‘मला कधीच खरे प्रेम मिळाले नाही’, करण जोहरने सांगितला त्याचा प्रेमाचा अनुभव
लग्नात परिणीतीने पतीला दिले खास सरप्राईज, अभिनेत्रीने गायिलेल्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

हे देखील वाचा