Wednesday, February 4, 2026
Home अन्य बिग ब्रेकिंग! जगविख्यात तबला वादकाचे चालू कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन

बिग ब्रेकिंग! जगविख्यात तबला वादकाचे चालू कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन

नुकतंच मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. जगविख्यात तबला वादक दिनेश प्रसाद मिश्र  यांचं (दि, 6 फेब्रुवारी) रोजी निधन झालं आहे. उत्तर प्रदेशाची राजधानी लखनउमध्ये सनतकदा आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांना तबला वाजवत असतानाच हृदय विकाराचा झटका आला ज्यामुळे तिथे जमलेल्या मंडळीची खळबळ उडाली आणि डॉक्टर येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

दिनेश मिश्र (Dinesh Mishra) यांची मोजनी जगामधील प्रसिद्ध तबला वादकांमध्ये केली जाते. उत्तरप्रदेशच्या लखनउमधील त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याता आलं होतं मात्र, त्या ठिकाणी कोणत्याच व्यक्तीला अंदाजा नव्हता की, ज्येष्ठ कलाकाराचा अशा प्रकारे जागीच मृत्यू होइल. वृत्तामधील मिळेलेल्या माहितीनुसार सोमवार (दि, 6 फेब्रुवारी) रोजी महिंद्रा सनतकदा कार्यक्रमामध्ये दिनेशजी तबला वाजवत होते. त्यावेळी अचानकच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांना त्वरितच जॉर्ज मेडिकल युनिवर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्ट येण्यापूर्वीच त्यांनी जीव सोडला.

दिनेश प्रसाद मिश्र यांना एसएनए नामंकनही प्राप्त.
दिनेश प्रसाद मिश्रा हे मुळचे मथुराचे होते. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार आलमबाग स्थित स्माशान घाटामध्ये होणार आहे. दिनेश यांना तबला वादकासाठी एसएनए नामंकनानेही सन्मानित केले होते. दिनेश आपल्या कुटुंबियांसोबत देवपुर पारामध्ये राहत होते. पंडित बाबू लाल बीएचयूमध्ये पखावज वादकाचे शिवक्षक होते. दिनेश यांना त्यांच्या वडिलांनीच सुरुवातीचे शिक्षण दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कोणामध्ये देखील एवढी ताकद नाही…’ अनुपम खेर यांनी ‘पठाण’बद्दल केले व्यक्तव्य
खरे की काय! सलमान खानच्या सिनेमातून शिव ठाकरे करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

हे देखील वाचा