Wednesday, March 29, 2023

ही दिवाळी नेटफ्लिक्सवाली! प्रेक्षकांसाठी येत आहे ‘हे’ धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरीज

ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्ससाठी भारतीय मार्केट किती महत्वपूर्ण आहे. याचा अंदाज सब्सक्राइबर्सच्या संख्येवरून लावता येताे. माध्यमांतील वृत्तांनुसार, नेटफ्लिक्सचे भारताता किमाण 55 लाख सब्सक्राइबर्स आहेत. यासाठी ओटीटी प्लेटफाॅर्म नेटफ्लिक्सने भारतीय सब्सक्राइबर्सला सणाच्या दिवसात एक माेठी भेट दिली आहे. या महिन्यात  जवळपास नेटफ्लिकसवर डझनभर चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज हाेणार आहे. नेटफ्लिक्सने नुकतंच येणाऱ्या शाेचे आणि चित्रपटाचे टीजर रिलीज केलं आहे. त्यामध्ये काेणत्या चित्रपटांचा समावेश आहे चला जाणून घेऊया…

मोनिका, ओ माय डार्लिंग (Monica O My Darling)
राजकुमार राव(Rajkumar Rao), हुमा कुरैशी आणि अभिनेत्री राधिका आप्टे यांचा ‘माेनिका, ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जैन मेरी खानने केलं आहे. या चित्रपटात जैन मेरी खान आणि शिवा रिंदानी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची स्टाेरी एका मर्डरवर आधारित आहे.

नयनतारा (बियॉन्ड द फेयरी टेल)
तमिळ, तेलगु आणि मल्याळम चित्रपटात आपली ओळख निर्माण करणारी साऊथची सुपस स्टार अभिनेत्री नयनतारानं याच वर्षी बाॅयफ्रेंड विग्नेश शिवानसाेबत लग्न केलं आहे. त्यांच लग्न काेणत्या चित्रपटाच्या स्टाेरीपेक्षा कमी नव्हते. म्हणुनच या सेलीब्रिटी कपलच्या लग्नावर आधारित एक डाॅक्यूमेंट्री रिलीज हाेणार आहे.

चोर निकल के भागा (Chor Nikal Ke Bhaga)
‘विक्की डोनर’ फेम म्हणजेच यामी गाैतम आणि ‘शिद्दत’  चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणारा सनी कौशल लवकरच साेबत दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज हाेणारा  ‘चोर निकल के भागा’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट अमर काैशिक आणि दिनेश विजन यांनी प्राेड्युस केला आहे.

गन्स एंड गुलाब (Guns and Gulaabs)
राजकुमार राव आणि दुलकर सलमान यांचा हा एक थ्रिलर चित्रपट आहे. नुकतंच या चित्रपटातील राजकुमार राव याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. त्याच्या फर्स्ट लूकने ऑडियंसला फार सरप्राइज केलं आहे. या चित्रपटात अभिनेते 90च्या दशकातील लूकमध्ये दिसत आहे.

कटहल (Kathal)
डायरेक्टर यशवर्धन मिश्राने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात सान्या मल्हाेत्रा ,अनंत जाेशी, पवन प्रेम आणि विक्रम प्रताप मुख्य भूमिका बजाताना दिसत आहे.

कॅट (CAT)
रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अशातच रणदीप नेटफ्लिक्सवर ‘CAT’ या वेब सीरीजद्वारे पदार्पण करणार आहे. ज्याचा टिजर देखील रिलीज झाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गुन्हा कबूल करणार की नवा डाव खेळणार? ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा थरारक टिझर आला समोर
कपिल शर्माच्या कार्यक्रमात येण्यास ऐश्वर्याचा नकार, कारण सलमान खान? पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा