Saturday, June 29, 2024

मनोरंजनविश्वातील ‘या’ प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु

उर्दू साहित्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल नाव म्हणजे जेष्ठ कवी मुनव्वर राणा होय. त्यांचे “किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई, मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई…” अनेक शेरोशायरीमुळे तमाम भारतीयांच्या मनावर आधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुनव्वर राणा यांची प्रकृती खालवली आहे.

प्रदिर्घ काळापासून आजारी असलेले मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांना लखनऊच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मुनव्वर यांची कन्या आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या सुमैया राणा यांनी एक व्हिडीओ (Sumaiya Rana Video) शेअर करून याबाबद माहिती दिली आहे. तो व्हिडीओ 3:30 वाजता शेअर करण्यात आला आहे.

सुमैया राणा यांनी सांगितले की, दोन ते तीन दिवसांपूर्वी मुनव्वर राणा यांची तबेत बिघडली होती. त्यामुळे त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डायलिसिसदरम्यान त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांचा सीटी स्कॅन करण्यात आले. त्यांना पित्ताशयाचा काही समस्या असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही  त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेच. तसेच पुढील 72 तास चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. संसर्ग कमी होण्यासाठी डाॅक्टर प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मुनव्वर राणा यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1952 रोजी उत्तर प्रदेश येथे झाला. मुनव्वर राणा यांनी उर्दू कविता शिकण्यासाठी अब्बास अली खान बेखुद आणि वली आसी यांना आपले गुरू बनवले आणि त्यांच्याकडून उर्दू शायरीची कला शिकून घेतली. ते रायबरेली जिल्ह्यातील आहेत. ते सामाजिक व राजकिय  मुद्यांवर सतत बोलत असतात.  त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.(Famous poet Munawwar Rana condition is alarming)

हे देखील वाचा