Tuesday, June 18, 2024

“जाड भुवया मानाने मिरवत अत्यंत निर्बुद्ध…” समीर चौगुलेंनी लिहिलेली ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

टीव्ही इंडस्ट्रीवरील अतिशय गाजलेला आणि लोकांच्या मनावर राज्य करणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हा शो संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाने खळखळून हसवण्याचा काम करतो. या शोच्या माध्यमातून मराठी मनोरंजन विश्वाला आणि खासकरून विनोदी विश्वाला अनेक उत्तम आणि प्रतिभावान कलाकार मिळवून दिले. यातलीच एक उत्तम अभिनेत्री म्हणजे चेतना भट्ट.

हास्यजत्रेतून आपल्या विविध स्कीटने आणि भूमिकांनी सगळ्यांना भरपूर हसवले. नेहमीच तिच्या प्रतिभेने तिने प्रेक्षकांना तिची दखल घ्यायला भाग पाडले. आज चेतनाने एक विनोदी अभिनेत्री अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या चेतनाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. अशातच तिचा सहकलाकार असलेल्या समीर चौगुलेने देखील चेतनासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीरने चेतना सोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “Happy birthday चेतना भट…जाड भुवया मानाने मिरवत अत्यंत निर्बुद्ध मुलीचं वरकरणी सोप्प वाटणारं पण खूप कठीण असणारं पात्र ही लीलया रंगवते…अवीट रागिणी म्हणून “हो ना हो ना” म्हणत संयमित अभिनय करताना अचानक मध्येच राग अनावर न झाल्याने ही ज्याप्रकारे लोचन मजनूच्या अंगावर चिडून जाते ते निव्वळ सुखद असत..आमच्या चेतूच्या अंगात “जर्की विनोद” ही ठाई ठाई भरलाय…सासू सुनेच्या प्रहसनात हिच्या अंगात वारं शिरतं आणि हिच्यातली खरी वेडसर मुलगी बाहेर येते आणि जे काही करते ते हसून हसून मुरकुंडी वळते….

हिला स्क्रिप्टमध्ये एक वाक्य असो वा हजार वाक्य…हिला अख्खं स्क्रिप्ट तोंडपाठ असतं…कोणतीही गोष्ट साध्य होईपर्यंत प्रचंड मेहनत करायची हा तिचा गुण मला प्रचंड आवडतो…चेहऱ्यावर नेहेमी निखळ हास्य घेऊन फिरणारी आमची चेतू ही उत्कृष्ट नृत्यांगनासुद्धा आहे. चेतुबरोबर मंच शेअर करणं यासारखा दुसरा आनंद नाही…आपल्या घरावर, माणसांवर,मित्रमैत्रिणींवर नितांत प्रेम करणारी आमची चेतना खूप हळवी सुद्धा आहे. आमच्या chetu ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम…”

समीरच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स करत चेतनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून समीरच्या लिखाणाचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा