Friday, July 5, 2024

धक्कादायक! प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लनला झालीय गंभीर दुखापत, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

लोकप्रिय गायक आणि रॅपर एपी ढिल्लन(AP Dhillon) याच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. गायक एपी ढिल्लन यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्वत: गायकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करतं ही माहिती दिली आहे. आपल्या आवडत्या गायकाला अशा अवस्थेत पाहून चाहते चिंतेत आहेत आणि एपी ढिल्लनच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच लोक एपी ढिल्लन जखमी कसे झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला
एपी ढिल्लनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर जखमी अवस्थेत दिसत आहे. मात्र, गायकाला एवढी गंभीर दुखापत कशी झाली याबाबत त्यांनी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. आंतरराष्ट्रीय दौऱ्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्याने आपल्या पोस्टद्वारे दिली आहे. यामुळे लॉस एंजेलिसमधील त्याच्या सर्व शो रद्द करण्यात आल्या आहेत.

चाहत्यांची मागितली माफी
एपी ढिल्लन यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने लिहिले की, ‘कॅलिफोर्नियातील माझ्या चाहत्यांना कळवताना मला फार वाईट वाटत आहे की एसफ आणि लॉस एंजेलिसमधील माझे शो पुढे ढकलण्यात येत आहे, कारण या दौऱ्यात मला अचानक दुखापत झाली आहे. मी ठीक आहे आणि लवकरच पूर्णपणे बरा होईल. मात्र, यावेळी मी परफॉर्म करू शकणार नाही. मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल मी माफी मागतो.

लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले
पोस्टमध्ये, एपी ढिल्लन यांनी काही आठवड्यांत चाहत्यांना भेटण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, तुमची तिकिटे नव्याने ठरलेल्या शोसाठी वैध असतील. एपी ढिल्लनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. चाहत्यांना त्यांच्या गाण्यांचे वेड आहे. या गायकाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. त्याचे शो जगभरात लोकप्रिय आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! अभिनेत्री कनिका मान हिचा हॅलोविन लूक, पाहा फाेटाे

बॉलिवूडच्या दबंग खानला जिवे मारण्याच्याच्या धमकीमुळे एनआयनं दिली वायप्लस सुरक्षा

हे देखील वाचा