रणवीर आणि आलियाने एपी ढिल्लन कॉन्सर्टमध्ये हजेरी लावत केली धमाल, व्हिडिओ झाला व्हायरल


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाची शूटिंग दिल्लीमध्ये होत आहे. आलियाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. ती आता पुन्हा एकदा सेटवर आली आहे. अशातच या दोन्ही कलाकारांनी बुधवारी रात्री गुडगावमधील एका कॉन्सर्टमध्ये डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दिल्लीमधील सटे गुरूग्राममध्ये एक कॉन्सर्ट चालू होता. जिथे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांना पाहून चाहते दीवाने झाले. रॅपर, गायक आणि लेखक एपी ढिल्लन या शोचे मुख्य आकर्षण होते. त्यामुळे रणवीर आणि आलिया तिथे गेले होते. तिथे दोघांनी जोरदार डान्स केला आहे. त्यांचे ‘ब्राऊन मुंडे’ गाणे चालू झाले तेव्हा रणवीर आणि आलिया डान्स करायला लागले. त्यांनी हा शो चांगलाच एन्जॉय केला. (Ranveer Singh and alia bhatt arrived at ap Dhillon’s concert with a break from shooting, dance video viral on social media)

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रणवीर आणि आलिया जोरदार डान्स करत आहे. ते दोघेही एपी ढिल्लन यांचे गाणे एन्जॉय करत होते. हजारो लोकांच्या गर्दीत ते हा शो बघण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आलिया भट्ट आणि करण जोहर दिल्लीमधील रस्त्यावर स्पॉट झाले होते. ते त्यांच्या कारने जात होते. त्यांना पाहून त्याचे चाहते खूप खुश झाले होते.

‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलियासोबतच धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. खूप दिवसानंतर करण जोहर दिग्दर्शन करणार आहे. त्याच्यासाठी हा चित्रपट खास असणार आहे त्यामुळे संपूर्ण टीम यासाठी खूप मेहनत घेत आहे. या आधी त्या दोघांची जोडी ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसली होती. त्यांचा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटात ही जोडी काय कमाल करणार आहे हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! चक्क आमिर खानने मागितली केजीफ स्टार यशची माफी

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

अरे वा! ‘मोनिशा’ आणि ‘अनुपमा’ची झाली भेट, या भेटीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!