Thursday, February 22, 2024

कैलाश खेर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्टेत घालणार हिऱ्यांचं जॅकेट,इंटरव्यूमधून खुलासा

आयोध्येत 22 जानेवारीला राममंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाची सामान्य लोकांपासून ते सुपरस्टारसपर्यंत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.या कार्यक्रमाला रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, कंगना रनौत, अक्षय कुमार आणि रणदीप हुडा यांसारख्या अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रीत केलं आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कैलाश खेरसुद्धा सहभागी होणार आहेत. कैलाश खेरनी नुकतेच एका इंटरव्यूमध्ये हा खुलासा केला आहे की, ते हिरेजडीत जॅकेट घालून श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत.

हिरेजडीत जॅकेट घालणार कैलाश खेर
कैलाश खेर(kailash kher) म्हणाले की,” मी आयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या(prabhu shri ram) प्राणप्रतिष्टेत सहभागी होण्यासाठी खुप उत्सुक आहे. मी या समारंभात स्वारोवस्की आणि अमेरिकन डायमंडसने जडलेलं जॅकेट (diamond jacket)घालून जाणार आहे. त्या जॅकेटवर ‘ जय श्री राम ‘ असं लिहिलेलं आहे. डिजायनरने जॅकेटवर ‘ जय श्री राम ‘ लिहून त्यावर स्वारोवस्कीचे हिरे लावले आहेत. परंतू मी हे जॅकेट 21 ला घालणार की 22 ला हे तर प्रभू श्री रामच ठरवतील.

स्वप्न खरं होण्यासारखी आहे राममंदिराची निर्मीती
ते पुढे म्हणाले,”याव्यतिरीक्त माझ्याकडे अजून एक जॅकेट आहे, ‘महामृत्युंजय मंत्र’ आणि सोबतंच ‘जय सिया राम’ असंही लिहिलं आहे. संपूर्ण देशातील सध्याचे वातावरण हे कौटुंबिक उत्सवासारखं आहे. आता कोणीही भारताकडे दयाभावाने पाहत नाही. मला नेहमी विदेशातून काॅल येतात,ते लोक म्हणतात,’अरे वाह,भारतात आहेस ‘,त्यांचं हे बोलणं ऐकुन गर्व वाटतो.” कैलाश खेर म्हणाले,’एक वेळ असा होता की राममंदिर फक्त कल्पनेतंच राहील असं वाटत होतं. परंतू आज आपलं स्वप्न खरं झालं आहे. जसं मला राममंदिर प्राणप्रतिष्टेचं आमंत्रण मिळालं तसं,लोकांचे काॅल आणि मेसेजेस यायला सुरुवात झाली.हे सर्व पाहुन स्वर्गातील माझे वडील खुप आनंदी झाले असतील ‘

हे सुपरस्टारस होणार राममंदिर प्राणप्रतिष्टेत सहभागी
सिनेसृष्टीतील कंगना रानौतच्या सोबतंच अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, आशा भोसले, अरुण गोविल, दीपिका चिखलिया, नितीश भारद्वाज, मधुर भंडारकर व प्रसून जोशी, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगन, सनी देओल, चिरंजीवी और रामचरण यांसारखे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच श्रीराम जन्मभूमीच्या उद्घाटन सोहळ्यात (pranpratishtha) पीएम मोदी, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दासदेखील सहभागी होतील. सांगितलं जातंय की मंदिर ट्रस्टकडून 7000पेक्षाही अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

हेही वाचा: ठरलं तर! ‘हे’ बॉलीवूड सेलीब्रेटी करणार आयोध्या वारी, घेणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन

 

हे देखील वाचा