Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड ‘कुमकुम’ फेम अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी केली होती आत्महत्या, वाचा कारण

‘कुमकुम’ फेम अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी केली होती आत्महत्या, वाचा कारण

टीव्हीच्या सुपरहिट शो ‘हिप हिप हुर्रे’, ‘रिश्ते’, ‘क्यों होता है प्यार’, ‘कम्बख्त इश्क’, ‘कुमकुम’ आणि ‘कुसुम’ यांमध्ये अभिनय करून कुलजीत रंधावाने घरोघरी आपली ओळख निर्माण केली. अभिनेत्री कुलजीत रंधावा आज जरी आपल्यामध्ये नसली, तरीही तिच्या आठवणी अजूनही तिच्या प्रियजनांच्या हृदयात आहेत. तिचे 8 फेब्रुवारी 2006 रोजी कुलजीत रंधावाचे निधन झाले. त्यावेळी ती केवळ 30 वर्षांची होती. जेव्हा कुलजीत कारकिर्दीच्या शिखरावर होती, तेव्हा तिने आत्महत्या केली.

कुलजीतच्या आत्महत्येची अचानक बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. कुलजीतने आत्महत्या केली यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. कुलजीत ही मुंबईत तिच्याच फ्लॅटमध्ये लटकलेली आढळली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोटही सोडली होती.

माध्यमांतील वृत्तानुसार, त्या सुसाईड नोटवर असे स्पष्ट लिहिले होते की, ‘तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरवू नये. जीवनाच्या कोणत्यातरी दबावाला ती सामोरे जाऊ शकत नाही’

त्याचवेळी काही लोक असेही म्हणाले की, प्रेमात फसल्यामुळे तिने असे पाऊल उचलले असेल. मीडिया रिपोर्टनुसार, कुलजितच्या निधनानंतर अशा बातम्याही उघडकीस आल्या, ती तिच्या माजी को-स्टार भानू उदयच्या प्रेमात होती आणि त्याच्याबरोबरच्या नात्यानंतर कुलजीतने असे पाऊल उचलले. तसेच कुलजीत बहुतेक अशा मालिकांमध्ये दिसली होती, ज्यांची एकता कपूरने निर्मिती केली होती.

हेही वाचा-

मोठी बातमी! प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा