Friday, June 14, 2024

निसर्गावर भाष्य करणारा आगळावेगळा ‘झाड’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार थिएटरमध्ये दाखल

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट यायला लागलेले आहेत. अगदी प्रत्येक विषयावर भाष्य करणारी कथा आपल्याला पडद्यावर पाहायला मिळते. परंतु आता पहिल्यांदाच झाड या विषयावर एक नवीन मराठी चित्रपट येत आहेत. आपल्या निसर्गातील झाडाचे महत्व आपल्याला पटवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे झाड नसेल तर पर्यावरणावर त्याचप्रमाणे माणसावर कोणते विपरीत परिणाम होऊ शकतात? यावर भाष्य करणारा हा झाड नावाचा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. 21 जून 2024 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

झाड या चित्रपटात आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती योगेश लीलाधर तसेच ग्रीन इंडिया फिल्म यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनाची जबाबदारी सचिन बन्सीधर डोईफोडे व प्रल्हाद उजगरे यांनी निभावलेली आहे. त्याचप्रमाणे सतीश सांडभोर यांनी या चित्रपटाचे छायांकन केलेले आहे. तसेच आदर्श शिंदे तसेच जानवी प्रभू अरोरा यांनी या चित्रपटातील गाणी गायलेली आहे.

या चित्रपटात डॉक्टर दिलीप डोईफोडे हे मुख्य अभिनेत्याच्या रूपात दिसणार आहे. त्याचप्रमाणे संदीप वायबसे हे सह अभिनेता देखील असणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्रीच्या भूमिकेत प्रियंका नेहरकर पाटलाच्या भूमिकेत धोत्रे सर, त्याचप्रमाणे पाटलीनीच्या भूमिकेश श्री मेसवाल या दिसणार आहेत. त्याचप्रमाणे कैलास भाऊ मुंडे हे या चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

एका आगळ्यावेगळ्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आपल्याला पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 21 जून 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

निया शर्माचे टेलिव्हिजनवर दणक्यात पुनरागमन, सुहागन चुडैल’मध्ये निभावणार महत्वाचे पात्र
गर्भनिरोधकांना प्रोत्साहन आणि जनजागृती करणार राधिका आपटे, करणार जोरदार कमबॅक

हे देखील वाचा