Saturday, April 19, 2025
Home अन्य Sonu Sood: इतक्या श्रीमंत सोनू सूदच्या डिनरचे बिल भरलं एका अनोळख्या व्यक्तीने; नेमकं काय घडलं?

Sonu Sood: इतक्या श्रीमंत सोनू सूदच्या डिनरचे बिल भरलं एका अनोळख्या व्यक्तीने; नेमकं काय घडलं?

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारा सोनू सूद (Sonu Sood ) गेल्या काही वर्षापासून सोनू सूद सातत्याने गरजूंची मदत करत आहे. त्यामुळे आज तो अनेकांसाठी सुपरहिरो झाला आहे. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू(Sonu Sood ) खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी हिरो झाला. विशेष म्हणजे सातत्याने तो करत असलेल्या समाजकार्यामुळे आज तो अनेकांचा आदर्श झाला आहे. याचाच प्रत्यय नुकताच आला. त्याच्या एका मोठ्या चाहत्यानं त्याला अनोख गिफ्ट दिलं आहे. ते पाहून अभिनेतादेखील थक्क झाला आहे.

काही तासांपूर्वीच सोनू सूदने (Sonu Sood ) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे सोनूने त्याला चाहत्याने दिलेल्या गिफ्टबद्दल सांगितले आहे. कोणी अनोळख्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलच्या जेवणाचं पैसे भरले आहेत आणि त्याच्यासाठी खास पत्र लिहले आहे. सोनूने पत्र आणि रेस्टॉरंटची झलक पोस्टद्वारे दाखवली आहे.

रेस्टॉरंटमधील एक फोटो शेअर करताना सोनू सूदने (Sonu Sood )लिहिले की, “हे कोणी केले हे मला माहीत नाही, पण कोणीतरी माझे रेस्टॉरंटमधील जेवणाचे संपूर्ण बिल दिले आणि एक पत्र लिहिले आहे. त्याने जे काही माझ्यासाठी केलं ते हृदयाला स्पर्श करुन गेलं आहे. धन्यवाद मित्रा… तुझ हे कृत्य मला खुप काही सांगून जाते. सोनूने पत्रही सोशल मीडियावर शेअर केले आहे. “तू देशासाठी केलेल्या चांगल्या कामांसाठी धन्यवाद.” असं या पत्रात म्हटले आहे.

सोनू सूदने आत्तापर्यंत अनेक गरजूंची मदत केली आहे. करोना काळातही तो अनेकांसाठी देवदूत ठरला होता. त्यानंतर त्याने सोनू सूद फाऊंडेशन सुरू केली. यामधून तो अनेकांना मदत करतो.

हेही वाचा

वयाच्या 61 व्या वर्षी पुन्हा तुटले टॉम क्रूझचे हृदय, 25 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप

‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात; विकी कौशिलसोबत आहे खास कनेक्शन?

हे देखील वाचा