‘आ तुम्हे इन बाहों मे भर के..’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; अदा पाहून पुन्हा एकदा चुकला चाहत्याच्या काळजाचा ठोका


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात एकही डायलॉग न बोलता, तिने प्रेक्षकांना पुरते वेडे करून सोडले. आता शालू सोशल मीडियावर जलवा करताना दिसते. वेगवेगळ्या पण जबरदस्त लुकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, ती बरीच लाईमलाईटमध्ये राहते. आता तिने पुन्हा तिचा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना वेड लावलं आहे.

राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका गाण्यावर अभिनय करत आहे. यातील तिची सुंदरता आणि अभिनय पाहून नेटकरी पुन्हा एकदा भरळून गेले आहेत. ‘तू ही हकीकत’ या गाण्यावरील शालूच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये हार्टचे ईमोजी पोस्ट केले आहेत. नेहमी प्रमाणेच राजेश्वरीच्या या व्हिडिओलाही खूप प्रेम मिळत आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी तिचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. व्हिडिओला आतापर्यंत २४ हजाराहून अधिक युजर्सने पाहिले आहे.

‘फँड्री’ चित्रपट रिलीझ होऊन बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र तरीही राजेश्वरीची लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस चाहत्यांमध्ये तिची क्रेझ वाढतच चालली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘इंडियन आयडल १२’मध्ये ‘मेरे रश्के कमर’ गाणं गायल्याने सोनू कक्कर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मूळ गाण्याची…’


Leave A Reply

Your email address will not be published.