Tuesday, July 9, 2024

एका लग्नात राजेश्वरीला एक देखणा मुलगा पसंत पडला, पण झालं असं की…

सोशल मीडिया आणि कलाकार यांचे खूपच जवळचे आणि दृढ नाते आहे. सोशल मीडियावर कलाकारांना त्यांची उपस्थिती दाखवण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असणे आजच्या काळात खूपच महत्वाचे झाले आहे. त्यांचे फॉलोवर्स, सोशल मीडियावरील लोकप्रियता देखील त्यांना काम मिळवून देण्यामध्ये मोठा हातभार लावते. म्हणूनच सोशल मीडिया आजच्या घडीला कलाकारांसाठी त्यांची लोकप्रियता वाढवण्याचे एक माध्यम झाले आहे.

चित्रपटांमधून गायब असणारे अनेक कलाकार येथे अगदी सहज सापडतात. आता सध्या इंस्टाग्रामवर ‘रील्स’ खूपच हिट आहेत. अनेक कलाकार वेगवेगळे रील्स बनवून सोशल मीडियावर टाकतात. यात आपले मराठी कलाकार देखील मागे नाही बरं का. अनेक मराठी कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरील रील्समुळे ओळखले जातात. यात अभिनेत्री राजेश्वरी खरातच देखील समावेश आहे. राजेश्वरी मागील काही महिनात्यांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. आज जर राजेश्वरीला पाहिले तर ‘फॅन्ड्री’ सिनेमातील ती आणि आजची राजेश्वरी. यात जमीन अस्मानाचा फरक आहे. (rajeshwari kharat told their crush but)

राजेश्वरीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये राजेश्वरी तिला आवडलेल्या मुलाबद्दल सांगताना दिसत आहे. खरं पाहिले तर राजेश्वरीने शेअर केलेला व्हिडिओ नसून ते एक रील आहे. यामध्ये ती म्हणते की, ” कल शादी मैं एक लडका पसंत आया, बाद मैं पता चला उसकी शादी है.” एवढे बोलून ती दारू पिताना दिसते. राजेश्वरीचे हे फनी मिम्स चांगलेच व्हायरल होत आहे. यावर अनेक मजेशीर कमेंट्स देखील येत आहे.

राजेश्वरीचा हा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावतो आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिच्या फॅन्सच्या भरभरून कमेंट्स येतात. राजेश्वरी स्वतः फॅन्सच्या सर्व कमेंट्स वाचून त्यांना रिप्लाय देखील देते. ‘फँड्री’ मध्ये दिसलेली राजेश्वरी नंतर ‘आयटमगिरी’ या चित्रपटात झळकली मात्र का सिनेमा खूप कमाल करू शकला नाही. राजेश्वरी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा ती सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज

-अभिनेत्री हंसिका मोटवानीने मालदीवमधून बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हे देखील वाचा