अक्षय कुमारच्या भन्नाट आणि वेगळ्या लूकमुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या पोस्टरलाँच ला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी काहीच दिवस बाकी असताना (९ नोव्हेंबर) नेटिझन्सनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या खिलाडीने नुकताच एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला ज्यामध्ये त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीच्या बाजूने मत मांडले. अक्षयच्या चाहत्यांना मात्र ही गोष्ट खटकली आणि त्याचे पडसाद अक्षय कुमारच्या कॉमेंट्स मध्ये पाहायला मिळाले.
शनिवारी जसे एम्सने सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाल्याची बातमी जाहीर केली, त्याबरोबरच अक्षय कुमारने सोशल मीडियावर जाऊन एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्याने कबूल केले की इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सची समस्या आहे पण त्यानी चाहत्यांना हे देखील सांगितले की या गोष्टीचे सामान्यीकरण संपूर्ण चित्रपट उद्योगाला वाईट समजू नका.
हा व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून नेटीझन्सने बॉलिवूडमधील ड्रग नेक्ससच्या सध्याच्या चौकशीवर संपूर्ण देश नाराज असताना चित्रपटसृष्टीची बाजू घेतल्यामुळे अक्षयला ट्रोल केलं जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने फिल्म इंडस्ट्रीत ड्रग माफियांनी तयार केलेल्या नेटवर्कच्या चौकशीत दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांच्यासह बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक ए-लिस्टर अभिनेते आणि व्यक्तिरेखांची नावे उघडकीस आणली.
अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बोंब’ या चित्रपटाला देशातील लोकांकडून विरोधाला सामोरे जावे लागणार आहे कारण #बॅनलक्ष्मीबॉम्ब आणि #बॉयकोटबॉलिवूड सारख्या हॅशटॅगचा सध्या ट्रेंड होत आहेत. नेटिझन्स कडून या चित्रपटासाठी इतका विरोध झाला आहे की गुगलला आपलं रीव्युवचा टॅब देखील बंद करावं लागला आहे. गेल्या ४ महिन्यांत निर्माण झालेल्या गदारोळामुळे अक्षयने घेतलेल्या या भूमिकेला प्रचंड विरोध होत आहे यात काही शंका नाही.