Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या ‘या’ लोकप्रिय जोड्यांच्या लग्नाची फॅन्सला आहे उत्सुकता

बॉलिवूडच्या ‘या’ लोकप्रिय जोड्यांच्या लग्नाची फॅन्सला आहे उत्सुकता

बॉलिवूड कलाकार आणि त्यांची गुपचूप चालणारी प्रेमप्रकरणं काही नवीन नाहीत. सध्या इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या प्रेम प्रकरणांची चर्चा माध्यमात रंगताना दिसत आहे, हे कलाकार जरी कधीच त्यांची प्रेमप्रकरणं समाजमाध्यमांसमोर मान्य करत नसले तरी जिथे आग असते, तिथूनच चिंगऱ्या येतात. या जोड्यांच्या फॅन्सला नेहमीच आपल्या आवडत्या जोड्यांची लवकर लग्नाच्या बेडीत अडकावे अशी इच्छा असते. चला तर पाहूया इंडस्ट्रीमधील अशा कोणत्या जोड्या आहेत ज्यांच्या लग्नाची वाट त्यांचे फॅन्स बघत आहे.

 

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल –
अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेम प्रकरणाची चर्चा मागील अनेक काळापासून माध्यमांत रंगली होती. दोघांनी कधीही याबद्दल खुलासा केला नसला तरी माध्यमांच्या कॅमेऱ्यात मात्र त्यांना अनेकदा एकत्र फिरताना कैद करण्यात आले होते. नुकतेच समोर आलेल्या बातमीनुसार दोघांनी आपल्या नात्याची कबुली देत डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर –
बॉलिवूड मधील सर्वात चर्चेत असणारी जोडी म्हणून आलिया आणि रणबीरच्या नावाचा उल्लेख होतो. दोघांनीही आपले प्रेमप्रकरण लपवण्याचा खुप प्रयत्न केला परंतु त्यांना त्यांचे प्रेम लपवता आले नाही. रणबीरच्या वाढदिवसाच्या दिवशी आलियाने सोसहल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘हॅप्पी बर्थडे लाईफ’ असे लिहिले होते. या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा –
आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव नेहमी प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा सोबत जोडले गेले आहे. यांनी जरी त्यांचे नाते कबूल केले नसले तरी त्यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची आतुरता आहे परंतु ते लग्न कधी कधी करणार हे सांगणे कठिण आहे.

मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर –
अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. ते नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

रिचा चड्डा आणि अली फजल –
प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्डा आणि अली फजल गेल्याच वर्षी विवाह बंधनात अडकणार होते परंतु लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले होते. आता पुन्हा त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल –
आपल्यापेक्षा कमी वयाच्या रोहमन शॉलला डेट करत असलेली अभिनेत्री सुश्मिता सेन हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. चित्रपट क्षेत्रात सध्या जास्त सक्रिय नसली तरी तिची लोकप्रियता मात्र आजही कमी झालेली नाही. आजही ती प्रचंड लोकप्रिय असून तिच्या चाहत्यांना या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

हे देखील वाचा