Tuesday, June 10, 2025
Home मराठी ‘गुपचूप गुपचूप जन्मले…समीर चौगुले’, वाढदिवसानिमित्त चाहत्याने दिली त्याला खास भेट

‘गुपचूप गुपचूप जन्मले…समीर चौगुले’, वाढदिवसानिमित्त चाहत्याने दिली त्याला खास भेट

मराठीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या परफेक्ट कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना लोटपोट करतात. अशा कलाकारांमध्ये समीर चौगुले याचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्याने त्याच्या या खास कौशल्याने लाखो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशा या विनोदवीराचा आज (२९ जून) वाढदिवस आहे.

वाढदिवसानिमित्त त्याच्यावर सर्व बाजूनी शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांपासून ते कलाकार या दिनी त्याला शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे, आपल्या चहित्या कलाकारांवर चाहत्यांना खूपच प्रेम असतं. बऱ्याचदा हे चाहते कलाकारांवरील त्यांचे प्रेमही व्यक्त करताना दिसतात. या खास दिवशी समीरसाठीही त्याच्या एका चाहत्यांने खास गिफ्ट पाठवलं आहे. याबद्दल समीरने स्वतः सोशल मीडियाद्वारे सर्वांना सांगितले आहे.

समीरच्या चाहत्याने त्याच्यासाठी केक पाठवला आहे. होय, या केकचा फोटो समीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या केकवर लिहिलं आहे, ‘गुपचूप गुपचूप जन्मले…समीर चौगुले’. हा फोटो शेअर करत समीरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझ्या स्किट मधलं माझ्यावरचं गाणं…केकवर. एका फॅनने घरी केक पाठवलाय. धन्यवाद.” असे म्हणत त्याने चाहत्याचे आभार मानले आहेत. (fans send cake for comedian samir choughule on his birthday)

समीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने विविध मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं आहे. ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोने समीरला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्या या कौशल्याचे प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक केले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा