प्रसिद्ध बॉलिवूड कोरियोग्राफर- दिग्दर्शिका फराह खान कोव्हिड- १९ पॉझिटिव्ह आढळली आहे. अलीकडेच दिग्दर्शक रुमी जाफरी यांना कोरोनाची लागण झाली होती. अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये संसर्गाची ही दुसरी घटना आहे. अशा स्थितीत फराह खानच्या संसर्गाची बातमी आणि तिसऱ्या लाटेची भीती चिंताजनक आहे. फराह आजकाल टीव्हीवरील एका कॉमेडी शोमध्ये परीक्षकेची भूमिकाही साकारत आहे. अशा परिस्थितीत मिका सिंगला आता तिच्या जागी पाहुणा परीक्षक म्हणून शोमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे.
फराह ‘सुपर डान्सर ४’ आणि ‘केबीसी १३’ मध्ये गेली
फराह खान काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीच्या डान्स रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’ च्या सेटवर शूट करण्यासाठी आली होती. याशिवाय तिने अमिताभ बच्चनसोबत ‘कौन बनेगा करोडपती १३’ साठी एक विशेष भाग शूट केला आहे. अशा परिस्थितीत फराहची कोरोना पॉझिटिव्ह येण्याची बातमी अनेक सेलिब्रिटींसाठी चिंतेचे कारण बनू शकते. फराहने स्वतः कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याची बातमी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.

फराहने इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की…
इंस्टाग्राम पोस्टमध्ये फराहने लिहिले, “मला आश्चर्य वाटले की, हे घडले. कारण मी माझा काळा टीका लावला नव्हता. मला दोन्ही लस मिळाल्या आहेत आणि ज्यांना दोन लस मिळाल्या आहेत त्यांच्यासोबत मी शूटिंग करत आहे. तरीही मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी माहिती दिली आहे. जर तरीही मी कोणाला विसरत असेल, तर कृपया तुमची चाचणी करा. आशा आहे की, मी लवकर बरी होईल.”
मिका सिंगने शोचा परीक्षक म्हणून घेतली फराहची जागा
दरम्यान, ‘झी कॉमेडी शो’च्या आगामी भागात गायक मिका सिंगला फराह खानच्या जागी परीक्षकाची भूमिका देण्यात आली आहे. दोन्ही लसीकरणाच्या एक मिहन्यानंतर फराह खानने कॉमेडी शोचे शूटिंग सुरू केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!
-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ