सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदिन खान पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आला आहे. फरदिन च्या यावेळी लाईम लाईटमध्ये येण्याचं कारण आहे त्याचा ट्रान्सफॉर्मेशन लूक! काही दिवसांपूर्वी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या मुंबईतील ऑफिसबाहेर फरदिन खान दिसला होता त्यावेळी त्याचा लूक पूर्णपणे बदलला होता.
फरदिन खानचे फोटो सोशल मीडियावर आले तेव्हा त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. काही वर्षांपूर्वी फरदिन खान याचं वजन खूपच वाढलं होतं. त्याचा चार्म मिसिंग वाटत होता. सगळीकडून त्याच्या जाडेपणाची खिल्ली उडवली जात असे. पण हा एक काळ असाही होता जेव्हा हाच फरदिन खान लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवत होता.
नव्वदीच्या दशकात फरदिन ने प्रेम अगन नावाच्या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. आणि त्यावर्षीचा फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यु अवॉर्ड देखील जिंकला होता. यानंतर त्याने लव्ह के लिये कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, ऑल द बेस्ट या सारखे अनेक सिनेमे केले. फरदिन चा २०१० साली आलेला ‘दुल्हा मिल गया’ हा सिनेमा अखेरचा चित्रपट ठरला.
बऱ्याच सिनेमांमध्ये काम केल्यानंतर फरदिन अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला. आणि जेव्हा माध्यमांसमोर आला तेव्हा त्याला ओळखणं देखील कठीण झालं होतं. त्याच वजन खूपच वाढलं होत. मग काय व्हायचं तेच झालं. सोशल मिडियावर नेटकरी त्याला ट्रोल करू लागले. याचं सडेतोड उत्तर आता फरदिन ने दिल आहे.
फरदिन हल्ली त्याच्या वडिलांचा वारसा चालवत आहे. बंगळुरू मध्ये फिरोज खान यांनी १०० एकर जागा खरेदी केली होती. जिथे त्यांचा फार्महाऊस देखील आहे, ज्यात घोड्यांचा सुद्धा समावेश आहे. हे सगळं संभाळतानाच फरदिन त्याच्या फिटनेसकडे सुद्धा खूपच लक्ष देताना दिसतो आहे.