Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमध्ये लवकरच उडणार आणखी एका लग्नाचा बार, ‘ही’ लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात

बॉलिवूडमध्ये लवकरच उडणार आणखी एका लग्नाचा बार, ‘ही’ लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या कलाकारांच्या लग्नाचा जोरदार धडाका चालू आहे. रोज विविध कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या कानावर येत असतात. नुकतीच मौनी रॉय विवाहबंधनात अडकली असून, आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये लग्नाचा बार उडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून गायिका आणि अभिनेत्री असलेल्या शिबानी दांडेकरसोबतच्या अफेयरमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या बातम्या मागील बऱ्याच काळापासून येत होत्या. एकदा बातमी आली की ते दोघं फेब्रुवारी महिन्यात कोर्ट मॅरेज करणार आहेत. मात्र आता बातमी येत आहे की, हे दोघेही कोर्ट मॅरेज केल्यानंतर बिग फॅट बॉलिवूड वेडिंगही करणार आहेत. मात्र त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

देशात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता फरहान आणि शिबानीने २१ फेब्रुवारीला कमी लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता देशात कोविडची सुधारत असल्याकारणामुळे त्यांनी त्यांची योजना बदलली आहे. रिपोर्टनुसार, कोर्ट मॅरेजनंतर फरहान आणि शिबानी थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला आहे, ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. फरहान आणि शिबानीने लग्नात सब्यसाचीचे आउटफिट घालण्याचा ठरवले असले तरी आद्यपही त्यांच्या आउटफिटबद्दल खूपच गुप्तता पाळली जात आहे.

फरहान-शिबानी जवळपास ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, ते लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. दोघांनीही एकत्र पाळीव प्राणी सुद्धा पाळले आहेत. दोघांनीही अनेकदा त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र २०१८ मध्ये त्यांनी त्यांचे नाते जगासमोर स्वीकारत ते नात्यात असल्याचा उलगडा केला. फरहानचे याआधीही एक लग्न झाले होते. त्याने हेअर स्टाईलिस्ट अधुनासोबत विवाह केला होता, पण त्यांचे लग्न टिकले नाही आणि ते वेगळे झाले. त्यांना दोन मुलीही आहेत.

दरम्यान फरहान अख्तर शेवटचा ‘तुफान’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि परेश रावलही महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट गेल्या वर्षी १६ जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. फरहान अख्तर सध्या त्याच्या आगामी ‘जी ले जरा’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित केला जाईल.

हेही वाचा :

हे देखील वाचा