Saturday, July 6, 2024

फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबत मिळून केली दिवाळीची पूजा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दिवाळी हा सण सुरु झाला आहे. वर्षभर आपण सर्व ज्या सणाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो, तो सण अखेर आला. दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच लोकांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीची आराधना केली जाते. ही पूजा सर्वच जणं मोठ्या आत्मयतीने करताना दिसतात. कलाकार देखील दिवाळीची पूजा करतात आणि त्यांच्या या पूजेचे सेलिब्रेशनचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करतात.

नुकताच बॉलिवूडचा हुशार दिग्दर्शक, निर्माता आणि प्रभावी अभिनेता असणाऱ्या फरहान अख्तरने त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फरहान त्याची गर्लफ्रेंड असणाऱ्या शिबानी दांडेकरसोबत दिवाळीची पूजा करताना दिसत आहे. नुकतीच फरहानने त्याच्या ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा केली. या शेअर केलेल्या फोटोमध्ये दिग्दर्शक रितेश सिधवानी देखील दिसत असून, फरहान आणि शिबानी शेजारी शेजारी बसलेले दिसत आहे.

या फोटोमध्ये फरहानने पांढऱ्या रंगाची ट्राउझर आणि निळ्या रंगाचा कुर्ता घातला असून, शिबानीने गडद हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये फरहान शिवानीला गंध लावताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना फरहानने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असून, सोबतच स्माईलीचे ईमोजी देखील पोस्ट केले आहे. शिबानीने त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले, “मिठाई, आठवणी आणि हास्याच्या सणासाठी, दिवाळीच्या शुभेच्छा.”

फरहान आणि शिबानी बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर आणि लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. फरहान आणि शिबानीने कधीही त्यांचे नाते जगासमोर मान्य केले नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम नेहमीच व्यक्त होत असते. फरहानने शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना, इंस्टग्राम अकाउंटवर त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, “अगदी मनापासून, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू.” मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वीच फरहानने शिबानीच्या नावाचे टॅटू देखील करून घेतले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटापासून दूर असूनही तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण आहे बच्चन घराण्याची सून, जाणून घ्या ऐश्वर्या रायचे नेटवर्थ

-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?

-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

हे देखील वाचा