Monday, April 15, 2024

धक्कदायक! ‘या’ फॅशन डिझायनरने केली आत्महत्या, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “माझा हा शेवटचा व्हिडीओ…”

मनोरंजनविश्वाशी संबंधित लोकांच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. सतत अशा बातम्या येत आहेत. आता पुन्हा एकदा अशी एक बातमी समोर आली आहे. मॉडेल आणि फॅशन डिझायनर असलेल्या मुस्कान नारंगने आत्महत्या करत तिचे आयुष्य संपवले आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे तिच्या राहत्या घरी बेडरूममध्ये तिने गळफास घेत तिचे जीवन संपवले आहे. तिच्या या अचानक उचलेल्या पावलामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुस्कानने वयाच्या २५ व्या वर्षी उचलेल्या या पावलांमुळे सर्वाना मोठा धक्का बसला आहे. होळीसाठी मुंबईहून आपल्या घरी गेलेली मुस्कान परत आलीच नाही. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे असणाऱ्या राम गंगा विहार कॉलनीत मुस्कान आणि तिचे कुटुंब राहते. मुस्कानने देहरादून येथून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ती मुंबईत आली आणि फॅशन डिझायनिंगमध्ये जॉब करू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Muskan Narang (@muskan_narang99)


मुस्कानच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती मुंबईहून आल्यानंतर खूपच चिंतेत दिसत होती. तिने आमच्यासोबत रात्री जेवण केले आणि झोपण्यासाठी रूममध्ये गेली. सकाळी बराचवेळ दरवाजा उघडला नाही म्हणून आम्ही खिडकीतून पहिले तर ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. मुख्य म्हणजे मुस्कानने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.

मुस्कानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “माझा हा शेवटचा व्हिडीओ असणार आहे. यानंतर मी तुम्हाला कधी दिसणार नाही. प्रॉब्लेम सांगितल्यानंतर सर्व काही सुरळीत होते, असे लोकं म्हणतात. पण, असे काहीच होत नाही. मी माझे आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र सर्वांनी मलाच समजावले.आज मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. यासाठी कोणीही दोषी नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Muskan Narang (@muskan_narang99)

दरम्यान पोलिसांनी आता पुढील तपास सुरु केला आहे. चंद्रप्रकाश नारंग हे उद्योगपती असून, ते डिस्पोजिबल क्रोकरीच्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये सामील आहे. नारंग यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुस्कान सर्वात मोठी होती. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं

काश्मीर फाइल्सला पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज अनुपम खेर यांचा फिल्मफेयर निशाणा म्हणाले, ‘इज्जत महाग गोष्ट…’

हे देखील वाचा