काचा नाही, साखळ्या नाही यावेळी उर्फीने सिमकार्ड वापरून तयार केला ड्रेस! नव्या लूकची तुफान चर्चा

0
58
urfi new look
photo courtesy: Instagram/urf7i

सोशल मीडिया सतत चर्चेत असणारी उर्फी ​​जावेद(Urfi Javed) अनेकदा तिच्या हटके फॅशन सेन्समुळे प्रसिद्धी झोतात्त येत असते. ती दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्समध्ये फॅशन प्रयोग करत असते. कधी उर्फी तिच्या हटके कपड्यांनी लोकांची मने जिंकते, तर कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. उर्फी नेहमीच विचित्र ड्रेसमुळे चर्चेत असते, पण, नुकताच तिने अशा एका गोष्टींनी बनवलेला ड्रेस परिधान केला आहे, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. आत्तापर्यंत ती अशा अनेक आउटफिट्समध्ये दिसली आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता पुन्हा एकदा उर्फी जावेदने नवीन ड्रेसमध्ये तिचा फोटो शेअर केला आहे.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या नवीन लूकचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी उर्फी सिमकार्डने बनवलेला ड्रेस परिधान करून फोटो पोझ देत आहे. पिवळ्या आणि निळ्या रंगाचे सिमकार्ड वापरून तिने स्वतःसाठी क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट बनवला आहे. तिच्या संपूर्ण ड्रेसवर सिमकार्ड चिकटवण्यात आले आहेत. उर्फीचा हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 2 हजार सिमकार्ड वापरण्यात आले आहेत. या ड्रेससह उर्फीने (Urfi Javed ) तिचा लूक पूर्ण करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. त्याचबरोबर तिची हाय हिल्स या लूकमध्ये आणखी भर घालत आहेत.

 

View this post on Instagram

 

उर्फी जावेदने आतापर्यंत ब्लेड, सॅक, प्लॅस्टिक, दगड, अगदी इलेक्ट्रिक वायरपासून बनवलेले ड्रेस परिधान केलेले आहेत. उर्फी अनेकदा असे म्हणताना दिसते की, ती स्वतः तिचे ड्रेस डिझाइन करते आणि असतच यावेळी अभिनेत्री अभिनेत्री उर्फी जावेदने चक्क मोबाईलच्या सिमकार्डपासून ड्रेस तयार केला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’मुळे मिळाली खरी ओळख!
उर्फीने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला आहे. या अनोख्या अवतारातही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. आता तिचा हा लूकही खूप व्हायरल होऊ लागला आहे. उर्फीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती अनेक टीव्ही शोमध्ये झळकली आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यावर उर्फी जावेदला विशेष ओळख मिळाली. या शोमधला उर्फीचा प्रवास फार मोठा नव्हता, पण अभिनेत्री घराघरांत प्रसिद्ध झाली, तेव्हापासून ती सतत चर्चेत राहिली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सिनेमादिनाला ‘ब्रम्हास्त्र’ची बंपर कमाई, इतर चित्रपटांच्या कमाईचे आकडे पाहुन व्हाल थक्क

अभिनेत्री अभिज्ञा भावेचं हटके फोटोशूट!
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here