Thursday, June 1, 2023

‘त्याची बायको त्याला न्यूड…’, राहुल वैद्यच्या ‘त्या’ ट्वीटवर आली उर्फी ​​जावेदची प्रतिक्रिया

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी ​​जावेद (Urfi Javed) अनेकदा तिच्या स्टाईल सेन्स आणि स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. तिच्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही केले जाते. मात्र उर्फी ट्रोल्सकडे विशेष लक्ष देत नाही. केवळ सामान्य लोकच नाही, तर अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या या विचित्र स्टाइलमुळे तिच्यावर निशाणा साधला आहे. यातील एक नाव गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याचे आहे. अलीकडेच राहुलने उर्फीची खिल्ली उडवली आणि लिहिले की, लोक आगामी काळात फॅशनच्या नावाखाली न्यूड पोस्ट करतील. त्याने ट्वीटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले, तरी ते उर्फीसाठी लिहिले असल्याचा अंदाज नेटकरी बांधू लागले.

उर्फी जावेदने दिली प्रतिक्रिया
राहुलच्या या ट्वीटनंतर बऱ्याच दिवसांनी आता उर्फी जावेदने यावर उत्तर दिलं आहे. राहुलच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने लिहिले की, “मी यावर बोलण्याचा खूप विचार केला. जरी हे थेट माझ्याबद्दल नसले, तरी ते चुकीचे आहे. हे विधान अजिबात योग्य नाही. आपण सर्वजण असे काही करतो, जे इतरांच्या दृष्टीने नैतिकदृष्ट्या योग्य नसते. तरीही आपण लोकांना जज का करतो? त्याच्या पत्नीने त्याला न्यूड फोटो पाठवल्याचे वाचून मला धक्का बसला.” (urfi javed reacts on rahul vaidya tweet wrote on instagram surprised that his wife send him this type of photo)

काय होतं राहुलचं ट्वीट
राहुल वैद्यने ११ मे रोजी एक ट्वीट केले होते, ज्यात लिहिले होते की, “मी आज इंस्टाग्रामवर एक फोटो पाहिला, जो माझ्या पत्नीने मला पाठवला होता. आणि माझ्या शब्द नोट करून ठेवा, की येत्या काही वर्षांत लोक फॅशनच्या नावाखाली न्यूड पोस्ट करणे सुरू करतील! पुराव्यासाठी हे ट्वीट सेव्ह करा. देव आपल्यावर कृपा करो.”

त्यावेळी उर्फीला या ट्वीटवर मीडियाने प्रश्न विचारला असता, तिने ते टाळले होते. हे ट्वीट तिच्यासाठी नाही, असे म्हणत तिने उत्तर दिले होते. मात्र आता तिने राहुलच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत, सिंगरवर निशाणा साधला आहे. दरम्यान यावर राहुलकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा